ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार स्व. गजानन भास्कर मेहेंदळे यांच्यावर आज दुपारी १ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे भाचे सत्येन वेलणकर यांनी मंत्राग्नी दिला. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव भारत इतिहास संशोधक मंडळात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यावेळी विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी, साहित्यिक, संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रामुख्याने – पांडुरंग बलकवडे, बी. डी. कुलकर्णी, अनुराधा कुलकर्णी, मंदार लवाटे, राहूल सोलापूरकर, मनोज पोचट, माधव भांडारी, अविनाश धर्माधिकारी, विक्रमसिंह मोहिते,
भूपाल पटवर्धन, लीनाताई मेहेंदळे, केदार फाळके, श्रीनिवास कुलकर्णी, राजेंद्र जोग
सुधीर थोरात, अरविंद जामखेडकर, गो. बं. देगलूरकर, राजा दीक्षित, मोहन शेटे, यशोवर्धन वाळिंबे, जगन्नाथ लडकत, आमदार भीमराव तापकीर, कर्नल पराग मोडक, विंग कमांडर शशिकांत ओक
पत्रकार सुनील माळी, संजय तांबट, मुकुंद संगोराम, दीपक पोटे, मिलिंद एकबोटे, सदानंद फडके आदींनी अंत्यदर्शन घेतले.
शनिवार २७ सप्टेंबर रोजी सायं. ५.३० वाजता भारत इतिहास संशोधक मंडळ येथे सर्व संस्थांच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आज वैकुंठात झालेल्या अंत्यसंस्काराच्या वेळी पुढील व्यक्तींनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. सर्वश्री, पांडुरंग बलकवडे (भारत इतिहास संशोधक मंडळ), सुधीर थोरात (श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ), माधव देशपांडे (रा. स्व. संघ), ॲड. सदानंद फडके (शिक्षण प्रसारक मंडळी ) व मोहन शेटे (इतिहास प्रेमी मंडळ)
🙏


