Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedब्रिजस्टोन इंडिया जीएसटी दरकपातीचा लाभ ग्राहकांना देणार

ब्रिजस्टोन इंडिया जीएसटी दरकपातीचा लाभ ग्राहकांना देणार

 

 

पुणे, 19 सप्टेंबर : प्रगत वाहतूक उपाययोजना आणि पर्यावरणस्नेही टायर उत्पादन क्षेत्रात जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या ब्रिजस्टोन इंडियाने आज जाहीर केले की भारत सरकारच्या निर्णयानुसार जीएसटी दरात करण्यात आलेल्या कपातीचा लाभ कंपनीतर्फे ग्राहकांना देण्यात येणार आहे. सुधारित दर 22 सप्टेंबरपासून लागू होतील आणि कमर्शियल तसेच पॅसेंजर वाहनांच्या सर्व विभागांतील ग्राहकांना याचा थेट लाभ मिळणार आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की ही दरकपात त्यांच्या प्रीमियम, स्टँडर्ड आणि स्पेशाल्टी टायरच्या संपूर्ण उत्पादन श्रेणीवर लागू होणार आहे.

“वाहन क्षेत्र अधिक सक्षम आणि मजबूत करण्याच्या दिशेने केंद्र सरकारचा हा निर्णय दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोन दर्शवतो, आणि यासाठी आम्ही माननीय पंतप्रधान आणि भारत सरकारचे आभार मानतो. ब्रिजस्टोन इंडियाला जीएसटी दरकपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवताना आनंद होत आहे. यामुळे टायर अधिक परवडणारे तर होतीलच, त्याबरोबर शाश्वत आणि अधिक सुरक्षित प्रवासाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले जाईल,” असे ब्रिजस्टोन इंडियाचे व्यवस्थापकीय उपसंचालक राजर्षी मोइत्रा म्हणाले.

 

ब्रिजस्टोन इंडिया नेहमीच शाश्वतता, नवोपक्रम आणि ग्राहककेंद्री उपक्रमांपासून ते राष्ट्रीय प्राधान्यक्रमांशी स्वतःला सुसंगत ठेवत आले आहे. उत्कृष्ट गुणवत्तेद्वारे समाजाची सेवा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि गेल्या 29 वर्षांपासून भारतात सुरक्षित वाहतुकीच्या दिशेने सातत्याने गुंतवणूक आणि प्रगती करत आहोत. जीएसटी दरकपातीचा लाभ ग्राहकांना देणे ही आमच्या पारदर्शकता आणि विश्वासार्हतेच्या मूल्यांप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे, तसेच ग्राहकांसोबतचा आमचा दीर्घकाळचा संबंध अधिक बळकट करणारे पाऊल आहे.

ब्रिजस्टोन इंडिया कार्यक्षम, टिकाऊ आणि सुरक्षित उत्पादनांची खात्री देण्याबाबत कटिबद्ध आहे आणि अधिक प्रभावी व सक्षम मोबिलिटी इकोसिस्टीमच्या दृष्टीकोनात सक्रिय योगदान देत आहे. कंपनी गुणवत्तेचा आणि सुरक्षिततेचा मूल्यमापदंड जपत आहे आणि त्याचबरोबर नवोपक्रमासाठी सातत्याने प्रयत्न करत वितरक आणि डीलर्सच्या नेटवर्कला मजबूत पाठबळ देत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments