Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedचतुःशृंगी मंदिरात घटस्थापना*

चतुःशृंगी मंदिरात घटस्थापना*

 

 

श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टतर्फे यावर्षीचा शारदीय नवरात्रोत्सव पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात सुरू झाला.

नवरात्रोत्सवाची घटस्थापना सकाळी नऊ वाजता मंदिर व्यवस्थापक विश्वस्त रविंद्र अनगळ यांच्या हस्ते करण्यात आली. त्या नंतर अभिषेक, रुद्राभिषेक, महावस्त्र अर्पण आणि महापूजा आणि महाआरती करण्यात आली. या सर्व पूजाविधीचे पौरोहित्य श्रीराम नारायण कानडे गुरूजी यांनी केले.

 

आज पहाटेपासून भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मागील शंभर वर्षांपासून चालत आलेली परंपरा कायम ठेवत, मंदिर ट्रस्टने भाविकांसाठी विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची या वर्षी ही आखणी केली आहे.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments