प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 220 रुपये ते 232 रुपये पर्यंतचा (“इक्विटी शेअर्स”) किंमतपट्टा निश्चित.
बोली/ऑफर बुधवार, 24 सप्टेंबर 2025 रोजी खुली होईल आणि शुक्रवार, 26 सप्टेंबर 2025 रोजी बंद होईल (“Bid Dates”). प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार, 23 सप्टेंबर 2025 आहे.
बोली किमान 64 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 64 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. (“No of Bids”)
RHP लिंक:
https://www.damcapital.in/files/pdf/638938312697259049_Jain_Resource_RHP.pdf
जैन रिसोर्स रीसायकलिंग लिमिटेड (“JRRL” किंवा “द कंपनी ”) कंपनी इक्विटी शेअरसाठी प्राथमिक समभाग विक्रीसाठीची बोली/ऑफर बुधवार, 24 सप्टेंबर 2025 पासून सुरू करणार आहे.
एकूण ऑफर साईज मध्ये प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या 1,250 कोटी रु. (12,500 दशलक्ष रु.) (“एकूण ऑफर साईज”) किंमतीच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. त्यामध्ये 500 कोटी रु. (5000 दशलक्ष रु.) पर्यंतचे फ्रेश इश्यू आणि 750 कोटी रु. (7,500 दशलक्ष रु.) मूल्याच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे. ऑफर फॉर सेल मध्ये कमलेश जैन (“प्रवर्तक विक्री समभागधारक”) यांच्याकडून 715 कोटी रु. (7,150 दशलक्ष रु.) पर्यंत आणि मयंक पारिक (“इतर विक्री समभागधारक”) यांच्याकडून 35 कोटी रु. (350 दशलक्ष रु.) पर्यंतचा समावेश आहे.
प्रति इक्विटी शेअरसाठी 220 रुपये ते 232 रुपये पर्यंतचा (“Price Band”) किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.
प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार, 23 सप्टेंबर 2025 आहे. बोली/ऑफर शुक्रवार, 26 सप्टेंबर 2025 रोजी बंद होईल. बोली प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या किमान 64 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 64 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. (“Bid Details”)
कंपनीचा फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ निधीचा उपयोग पुढीलप्रमाणे करण्याचा प्रस्ताव आहे: (i) साधारण 375 कोटी रु. (3,750 दशलक्ष रु.) एवढ्या कंपनीने घेतलेल्या काही प्रलंबित कर्जाचे पूर्ण किंवा काही प्रमाणात आगाऊ परतफेड/नियोजित परतफेड करण्यासाठी (ii) आणि उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी. (“ऑफरचा उद्देश”)
हे इक्विटी शेअर्स कंपनीच्या दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस द्वारे सादर करण्यात येत असून चेन्नईत रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, तमिळनाडू आणि अंदमान (“RoC”) यांच्याकडे दाखल करण्यात आले आहेत.
कंपनीचे रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस द्वारे हे इक्विटी शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) आणि बीएसई लिमिटेड (“BSE”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे.
डीएएम कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स लिमिटेड आणि पीएल कॅपिटल मार्केट्स प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”)
आहेत


