Thursday, October 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्‍कोडा ऑटो इंडियाने पुण्‍यामध्‍ये तीन नवीन ग्राहक टचपॉइण्‍ट्ससह उपस्थिती वाढवली  हडपसर,...

स्‍कोडा ऑटो इंडियाने पुण्‍यामध्‍ये तीन नवीन ग्राहक टचपॉइण्‍ट्ससह उपस्थिती वाढवली  हडपसर, वाघोली आणि सातारा रोड येथे नवीन सुविधांचे उद्धाटन करण्‍यात आले. 

 

पुण्‍यामध्‍ये आता १३ ग्राहक टचपॉइण्‍ट्स आहेत, ज्‍यासह शहरामध्‍ये त्‍यांची उपस्थिती अधिक दृढ झाली आहे.

देशभरातील नेटवर्क १७७ शहरांमध्‍ये ३१० हून अधिक टचपॉइण्‍ट्सपर्यंत वाढले.

 

पुणे, सप्‍टेंबर २३, २०२५ – स्‍कोडा ऑटो इंडियाने पुण्‍यामध्‍ये तीन नवीन ग्राहक टचपॉइट्सचे उद्घाटन केले आहे, ज्‍यासह महाराष्‍ट्रातील त्‍यांचे नेटवर्क अधिक दृढ केले आहे. धोन मोबिलिटी प्रा. लि. सोबत सहयोगाने लाँच करण्‍यात आलेल्‍या या नवीन सुविधांमध्‍ये हडपसर व वाघोली येथे दोन फुल-फंक्‍शन डिलरशिप्‍स (एफएफडी) आणि सातारा रोड येथे सेल्‍स ब्रांचचा समावेश आहे. एकत्रित, ते महाराष्‍ट्रातील ब्रँडच्‍या वाढत्‍या नेटवर्कमध्‍ये भर करतात, जे आता ४४ ग्राहक टचपॉइण्‍ट्सपर्यंत पोहोचले आहे.

हडपसर विक्री सुविधेमध्‍ये ३,७५० चौरस फूट क्षेत्रासह सहा कारसाठी समर्पित डिस्‍प्‍ले क्षेत्र आहे, तर वाघोली टचपॉइण्‍टमध्‍ये ५,९५५ चौरस फूट विक्री सुविधेसह सहा-कार डिस्‍प्‍ले सेट-अप आहे, ज्‍याला पूरक १८,००० चौरस फूट सर्विस सुविधा आहे, ज्‍यामध्‍ये १४ सर्विस बे आहेत. तसेच सातारा रोड विक्री सुविधा २,८६५ चौरस फूट जागेवर पसरलेली आहे आणि त्‍यामध्‍ये पाच कारसाठी डिस्‍प्‍ले क्षेत्र आहे. हे सर्व टचपॉइण्‍ट्स स्‍कोडाच्‍या मॉडर्न सॉलिड जागतिक डिझाइन तत्त्वाचे पालन करतात, जेथे ग्राहकांसाठी स्‍वागतार्ह वातावरणाची खात्री मिळते आणि उत्तम विक्री व विक्रीपश्चात्त अनुभव मिळतो.

या नवीन ग्राहक टचपॉइण्‍ट्सच्‍या उद्घाटनाबाबत मत व्‍यक्‍त करत स्‍कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक आशिष गुप्‍ता म्‍हणाले, ”पुणे नेहमी महाराष्‍ट्रातील ऑटोमोटिव्‍ह क्षेत्रासाठी महत्त्वाचे केंद्र राहिले आहे आणि येथे आमच्‍या विस्‍तारीकरणामधून स्‍कोडासाठी या बाजारपेठेचे वाढते महत्त्व दिसून येते. या नवीन सुविधांसह आम्‍ही ग्राहकांना आमची संपूर्ण उत्‍पादन श्रेणी अधिक जवळ उपलब्‍ध करू देत आहोत, तसेच ते सर्विस व केअरच्‍या सर्वोच्‍च दर्जाचा अनुभव घेतील याची खात्री घेत आहोत. महाराष्‍ट्र भारतातील आमच्या यशाचा महत्त्वपूर्ण आधारस्‍तंभ राहिला आहे आणि कायलॅक, कुशक, कोडियक व स्‍लाव्हियासह आम्‍हाला बाजारपेठेतील विविध महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्‍याचा देखील आत्‍मविश्वास आहे.”

धोन मोबिलिटीचे डिलर सहयोगी श्री. संतोष धोन म्‍हणाले, ”आम्‍हाला पुण्‍यामध्‍ये तीन नवीन आऊटलेट्स सुरू करण्‍यासाठी स्‍कोडा ऑटो इंडियासोबत सहयोग करण्‍याचा अभिमान वाटतो. या सुविधा प्रदर्शनापासून डिलिव्‍हरीपर्यंत प्रीमियम ग्राहक अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत, तसेच अत्‍याधुनिक सर्विस सपोर्ट देखील देतात. आम्‍ही पुण्‍यातील ग्राहकांना स्‍कोडाच्‍या उत्‍पादनांची सर्वोत्तम श्रेणी आणि मालकीहक्‍क प्रवासाचा आनंद देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.”

ग्राहकांच्‍या अधिक जवळ

गेल्‍या काही वर्षांमध्‍ये स्‍कोडा ऑटो इंडियाने आपले नेटवर्क २०२१ मधील १२० हून अधिक टचपॉइण्‍ट्सवरून आजच्‍या तारखेपर्यंत १७७ शहरांमधील ३१० हून अधिक टचपॉइण्‍ट्सपर्यंत वाढवले आहे. कंपनी ग्राहकांच्‍या अधिक जवळ जाण्‍याप्रती आपल्‍या ध्‍येयाबाबत पक्की आहे आणि संपूर्ण भारतातील ग्राहकांना विनासायास अनुभव देण्‍याप्रती कटिबद्धता अधिक दृढ करत आहे

.

*****

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments