गुरूग्राम, भारत – सप्टेंबर २२, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज त्यांच्या नवीन गॅलेक्सी वीअरेबल्ससोबत नुकतेच लाँच केलेली गॅलेक्सी वॉच८ सिरीज आणि गॅलेक्सी बड्स३ एफईवर अभूतपूर्व किमतींची घोषणा केली. सणासुदीच्या काळापूर्वी गॅलेक्सी वॉच अल्ट्रा आणि गॅलेक्सी रिंग या इतर काही उत्पादनांवर मोठ्या सूट मिळणार आहेत. या विशेष सूट ग्राहकांना गॅलेक्सी वीअरेबल्स लाँच झाल्यापासून सर्वात आकर्षक किमतींमध्ये खरेदी करण्याची उत्तम संधी देतात.
आजपासून गॅलेक्सी वॉच८ सिरीज जवळपास १५,००० रूपयांच्या मोठ्या सूटसह उपलब्ध असेल, तर नुकतेच लाँच करण्यात आलेले गॅलेक्सी बड्स३ एफई ४,००० रूपयांच्या सूटसह उपलब्ध असेल. गॅलेक्सी वॉच अल्ट्रा १८,००० रूपयांच्या सूटसह उपलब्ध असेल आणि गॅलेक्सी रिंग १५,००० रूपयांच्या सूटसह उपलब्ध असेल; त्वरित कॅशबॅक किंवा अपग्रेड बोनसच्या माध्यमातून या विशेष किमतींचा आनंद घेता येऊ शकतो, जे मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त, अधिक किफायतशीरपणाचा शोध घेत असलेले ग्राहक जवळपास १८ महिन्यांसाठी नो-कॉस्ट ईएमआयचा फायदा घेऊ शकतात.
गॅलेक्सी वॉच८ सिरीज
गॅलेक्सी वॉच८ सिरीज जेमिनी, गुगलचे एआय असिस्टण्ट असलेली पहिली स्मार्टवॉच सिरीज आहे, जी वापरकर्त्यांना हँड्स-फ्री नैसर्गिक वॉईस कमांड्सचा वापर करण्याची आणि विविध गॅलेक्सी वॉच अॅप्समध्ये टास्क पूर्ण करण्याची सुविधा देते. पहिल्यांदाच गॅलेक्सी वॉच८ सिरीजमध्ये अॅण्टीऑक्सिडण्ट इंडेक्स सादर करण्यात आले आहे, जे तुमच्या सेल्युलर हेल्थचे रिअल-टाइम व्ह्यू देते.
वन यूआय वॉच ८ सह वीअर ओएस ६ वर संचालित गॅलेक्सी वॉच८ सिरीजमध्ये सुधारित वैशिष्ट्यांची देखील भर करण्यात आली आहे, जसे मल्टी-इन्फो टाइल्स, नवीन नाऊ बार आणि सोयीसुविधेसाठी सुव्यवस्थित नोटिफिकेशन्स. गॅलेक्सी वॉच अल्ट्राच्या कूशन डिझाइनच्या पायावर डिझाइन करण्यात आलेल्या गॅलेक्सी वॉच८ ची जाडी फक्त ८.६ मिमी आहे, ज्यामधून प्रोफाइल व आकर्षक लुक, दिवसभर आरामदायी फिट मिळते, ज्याचे श्रेय त्यामधील नवीन डायनॅमिक लग सिस्टमला जाते. गॅलेक्सी वॉच८ सिरीजमध्ये आकर्षक सुपर एएमओएलईडी डिस्प्लेसह ३००० नीट्स सर्वोच्च ब्राइटनेस आहे, जे बाहेर सर्वोत्तम दृश्यमानतेची खात्री देते.
वॉच८ क्लासिक लोकप्रिय रोटेटिंग बेझेल डिझाइन आणि अॅप्स व रूटिन्स लवकर उपलब्ध होण्यासाठी नवीन ‘क्विक बटन’सह पारंपारिक आकर्षकतेमध्ये अधिक भर करते. हा डिवाईस सिंगल मिमी आकारामध्ये, तसेच प्रीमियम स्टेनलेस-स्टील केस, सफायर क्रिस्टल डिस्प्ले आणि बाहेर सुस्पष्ट दृश्यमानतेसाठी अपग्रेडेड ब्राइटनेससह येतो. गॅलेक्सी वॉच८ सिरीज सॅमसंगची स्वास्थ्यावर केंद्रित करणाऱ्या स्मार्टवॉचेसची सर्वात प्रगत श्रेणी आहे, ज्यामध्ये सुधारित डिझाइनसह शक्तिशाली हेल्थ ट्रॅकिंग आहे. अपग्रेडेड बायोअॅक्टिव्ह सेन्सरसह सुसज्ज हा डिवाईस झोपेबाबत अधिक अचूक माहिती देतो, तसेच बेडटाइम गाइडन्स सर्कंडियन लयवर देखरेख ठेवते आणि झोपेच्या सानुकूल वेळेबाबत शिफरस करते. तसेच व्हॅस्कुलर लोड मॉनिटरिंग आणि स्लीप कोचिंग सर्वोत्तम सवयी जडण्यास मदत करतात. नवीन एआय-समर्थित एनर्जी स्कोअर दररोज शारीरिक व मानसिक ऊर्जेची माहिती देते, तर रनिंग कोच प्रत्यक्ष मार्गदर्शनासह वैयक्तिकृत प्रशिक्षण प्लॅन्स देते.
गॅलेक्सी बड्स३ एफई
गॅलेक्सी बड्स३ एफई गॅलेक्सी एआय, सुधारित ऑडिओ तंत्रज्ञान आणि आयकॉनिक ब्लेड डिझाइनच्या उत्साहवर्धक संयोजनासह येतो, ज्यामुळे वापरकर्ते गॅलेक्सी परिसंस्थेमध्ये सामील होण्यासह उत्साहाने सर्वोत्तम राहणीमान आणि वेलनेसचा आनंद घेऊ शकतात. या डिवाईसमध्ये मुलभूत नाविन्यता आणि सुधारणांची भर करण्यात आली आहे, जसे प्रगत अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन, तसेच कॉल क्वॉलिटी, बॅटरी क्षमता आणि आरामदायीपणामध्ये देखील सुधारणा करण्यात आली आहे.
भाषांतरासाठी गॅलेक्सी बड्स३ एफई तुमच्या स्मार्टफोनमधील गॅलेक्सी एआय इंटरप्रीटर अॅपसह वापरता येऊ शकतो, ज्यामुळे परदेशी भाषेमध्ये लेक्चर ऐकता येऊ शकते किंवा दुसऱ्या भाषेत इतरांसोबत संवाद साधता येऊ शकतो. ‘हाय गुगल’ सारख्या वाक्यांचा उपयोग केल्यानंतर गॅलेक्सी बड्स३ एफई स्क्रिन किंवा हातांशिवाय माहिती ऐकू शकतो, समजून घेऊ शकतो आणि प्रतिसाद देऊ शकतो. वापरकर्त्यांना फक्त त्यांचा आवाजाचा वापर करायचा आहे. तुम्ही तुमच्या खिसा किंवा बॅगेमधून फोन न काढता दैनंदिन अजेंडा किंवा ईमेल तपासू शकता. तसेच, एआय वैशिष्ट्ये आणि गॅलेक्सी बड्स३ एफई डिझाइन खात्री देते की, पुढील प्लेलिस्ट चालू करणे किंवा एका भाषेमधून दुसऱ्या भाषेमध्ये संवादाचे भाषांतर करणे फक्त एक शब्द किंवा लॉंग प्रेससह उपलब्ध होते.
गॅलेक्सी रिंग
२४/७ तास आरोग्यावर देखरेख ठेवण्यासाठी डिझाइन करण्यात आलेली गॅलेक्सी रिंग दैनंदिन स्वास्थ्यासाठी साधा दृष्टिकोन देते. प्रीमियम मटेरिअल्स, तसेच अधिक टिकाऊपणासाठी टायटॅनियम फिनिशसह डिझाइन करण्यात आलेली गॅलेक्सी रिंग आयपी६८ जलरोधक व धूळरोधक आहे आणि १०एटीएम रेटिंगसह जवळपास १०० मीटरपर्यंत सखोलतेचा सामना करू शकते. यामुळे गॅलेक्सी रिंग अत्याधुनिक, पण शक्तिशाली अॅक्सेरी असण्यासोबत सर्व वापरासाठी परिपूर्ण आहे. गॅलेक्सी रिंग वजनाने हलकी आहे, ज्यामुळे दररोज परिधान करण्यासाठी योग्य आहे आणि जवळपास ७ दिवसांपर्यंत बॅटरी कार्यरत राहते, जी विशेष डिझाइन केलेल्या चार्जिंग केसमध्ये सामावून जाते, ज्यामध्ये चार्जिंग स्थिती समजण्यासाठी आकर्षक एलईडी लायटिंग आहे. सॅमसंगच्या प्रोप्रायटरी ‘हेल्थ एआय’ची शक्ती असलेली गॅलेक्सी रिंग रिअल-टाइम माहिती देते, ज्यामुळे वापरकर्ते सहजपणे गॅलेक्सी रिंग परिधान करू शकतात आणि मागील बाजूस एआय-संचालित माहिती कार्यरत राहते, ज्यामधून वैयक्तिकृत शिफारशी व वेलनेस टिप्स मिळतात. सर्व डेटा व माहिती कोणत्याही सबस्क्रिप्शन शुल्कांशिवाय एकत्रित प्लॅटफॉर्ममध्ये विनासायास उपलब्धतेसाठी सॅमसंग हेल्थमध्ये एकीकृत करण्यात आले आहेत. गॅलेक्सी रिंग दररोज स्वास्थ्यावर देखरेख ठेवते, ज्यामुळे वापरकर्त्यांना हृदयाच्या आरोग्याबाबत माहिती मिळते, तसेच एचआर मॉनिटरिंग उच्च/कमी हृदयाच्या ठोक्यांबाबत दक्ष करते.
गॅलेक्सी रिंग आपोआपपणे वर्कआऊट्सना (चालणे व धावणे) ओळखते, तसेच वापरकर्त्यांना त्यांची ध्येये संपादित करण्यास प्रेरित करण्यासाठी सक्रिय अलर्ट्स देते. गॅलेक्सी रिंगमध्ये सॅमसंगचे दर्जात्मक स्लीप अॅनालिसिस आणि शक्तिशाली स्लीप एआय अल्गोरिदम देखील आहे. स्लीप स्कोअर आणि स्नोरिंग अॅनालिसिस (घोरण्याचे विश्लेषण) यासह नवीन स्लीप मेट्रिक्स, जसे झोपेदरम्यान हालचाल, स्लीप लॅटेण्सी, हार्ट व रिस्पायरेटरी रेट झोपेच्या दर्जाचे तपशीलवर आणि अचूक विश्लेषण देते.
ऑफरबाबत माहिती:
उत्पादन
मूळ किंमत
उत्सवी डिल किंमत
गॅलेक्सी बड्स३ एफई
१२,९९९ रूपये
८,९९९ रूपये
गॅलेक्सी बड्स३ प्रो
१९,९९९ रूपये
१३,९९९ रूपये
गॅलेक्सी रिंग (सर्व आकार)
३८,९९९ रूपये
२३,९९९ रूपये
गॅलेक्सी वॉच अल्ट्रा
५९,९९९ रूपये
४१,९९९ रूपये
गॅलेक्सी वॉच८
सिरीज
३२,९९९ रूपयांपासून
२२,९९९ रूपयांपासून


