Saturday, October 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedनोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर तर्फे नवरात्रोत्सवानिमित्त हडपसरमधील 9 पोलिस स्थानकांसाठी सीपीआर...

नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर तर्फे नवरात्रोत्सवानिमित्त हडपसरमधील 9 पोलिस स्थानकांसाठी सीपीआर प्रशिक्षणाचे आयोजन

पुणे,23 सप्टेंबर 2025 : नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर तर्फे हडपसर परिसरातील नऊ पोलिस स्थानकांमधील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी फिजिओथेरपी शिबिरांसह सीपीआर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश समाजाची अथक सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांचे आरोग्य आणि तंदुरूस्ती राखणे हा आहे. या उपक्रमात सर्व उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांसाठी प्रमाणित सीपीआर प्रशिक्षणाचा समावेश आहे.

 

नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरमधील ईमर्जन्सी ॲन्ड ट्रॉमा विभागाचे प्रमुख डॉ.प्रथमेश राऊत म्हणाले की,आपात्कालीन परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना आवश्यक कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज करणे हे आमचे ध्येय आहे. या प्रशिक्षणामुळे हृदयविकारासारख्या आपात्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा पोलिसांचा आत्मविश्वास वाढून सार्वजनिक सुरक्षितता मजबूत होण्यास मदत होणार आहे. हा कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर प्रत्येक अधिकाऱ्याला सीपीआर प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

 

या उपक्रमाचा एक भाग म्हणून दीर्घकाळ काम करणे,शारीरिक ताणतणाव व दीर्घकाळ उभे राहणे यामुळे उद्भवणाऱ्या सामान्य स्नायूंच्या समस्यांसाठी (मस्क्युलोस्केलेटल) फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये प्रशिक्षित फिजिरोथेरपिस्टची टीम अल्पकाळातील उपचार योजना,अर्गोनॉमिक्सविषयी सल्ला तसेच वेदना कमी करण्यासाठी व पुढील दुखापती टाळण्यासाठी उपयुक्त व्यायामाबद्दल मार्गदर्शन करणार आहे.

 

नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की,आपत्कालीन परिस्थितीत पोलिस कर्मचारी अनेकदा सर्वात पहिले प्रतिसाद देणारे असतात आणि त्यांना महत्त्वाच्या सीपीआर कौशल्यांचे प्रशिक्षण दिल्यास आपात्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्यास मदत होऊ शकते. पोलिस दलाशी भागीदारी करण्याचा आम्हाला अभिमान आहे,एकत्रितपणे,आम्ही एक सुरक्षित आणि निरोगी समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू.

 

नोबल हॉस्पिटल पोलिस दलाच्या अमूल्य योगदानाबद्दल मनापासून आभार मानते आणि भविष्यात ही भागीदारी अशीच सुरू ठेवण्यास उत्सु

क आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments