Saturday, October 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedनवरात्र उत्सव काळात कार्ला फाटा येथे अवजड वाहनांना बंदी

नवरात्र उत्सव काळात कार्ला फाटा येथे अवजड वाहनांना बंदी

पुणे : श्री एकविरा देवी नवरात्र उत्सव २०२५ दरम्यान मोठ्या प्रमाणावर भाविकांचा ओघ कार्ला येथील मंदिराकडे जाणार असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे जितेंद्र डूडी यांनी आदेश जारी केले आहेत.

 

 

 

दि. २२ सप्टेंबर २०२५ ते दि. २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मौजे कार्ला फाटा येथून श्री एकविरा देवी मंदिर पायथ्याकडे जाणाऱ्या सर्व अवजड व मोठ्या वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे. यासाठी कार्ला फाटा येथे हाइट बॅरिकेटिंग उभारण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments