डीआरएचपी लिंक: https://www.axiscapital.co.in/contents/Purple%20Style%20Labs%20Limited-DRHP-1758601742.pdf
पर्नियाज पॉप-अप शॉपची पॅरेंट कंपनी आणि भारतातील सर्वात मोठ्या मल्टी-ब्रँड लक्झरी फॅशन प्लॅटफॉर्मपैकी एक पर्पल स्टाईल लॅब्ज (PSL) कंपनीने प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) साठी सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) सादर केले आहे. या ऑफरमध्ये प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याचे एकूण 660 कोटी रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू समाविष्ट आहेत.
पर्पल स्टाईल लॅब्ज (“PSL” किंवा “कंपनी”) आर्थिक वर्ष 2024 मध्ये महसुलानुसार भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात वेगाने वाढणाऱ्या मल्टी-ब्रँड लक्झरी फॅशन प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. महिलांची वस्त्रप्रावरणे, पुरुषांचे पोषाख, फाईन ज्वेलरी, फॅशन ज्वेलरी, मुलांचे कपडे आणि अॅक्सेसरीज अशा 211,727 पेक्षा जास्त SKUs च्या पोर्टफोलिओसह, PSL 1,312 पेक्षा जास्त अॅक्टिव्ह डिझायनर ब्रँड्सची उत्पादने सादर करते. डिझायनर्ससोबतच्या विस्तृत नेटवर्कमुळे कंपनीला स्पर्धात्मक फायदा मिळतो. ग्राहकांना अतुलनीय असे पर्याय उपलब्ध होतात आणि डिझायनर्सना अद्वितीय दृश्यमानता, जागतिक पोहोच आणि किंमत स्थैर्य मिळते.
इंडस्ट्री डेटा PSL च्या अतुलनीय वैशिष्ट्यपूर्ण वाढीच्या प्रवासावर प्रकाश टाकतो. पर्नियाज पॉप-अप शॉपने आर्थिक वर्ष 20 मध्ये फक्त 45 कोटी रु. च्या महसुलापासून आर्थिक वर्ष 24 मध्ये 508 कोटी रु. पेक्षा जास्त महसुलापर्यंत वाढ केली. त्यामुळे लक्झरी आणि ब्रिज-टू-लक्झरी कंपन्यांमध्ये 83% CAGR सह सर्वात वेगवान वाढींपैकी एक म्हणून कंपनीची नोंद झाली. ही वाढ लुई व्हिटॉन, गुच्ची सारख्या जागतिक ब्रँड्स आणि सब्यसाची, आझा फॅशन्स सारख्या देशांतर्गत स्पर्धकांनाही मागे टाकत आहे. या मजबूत वाढीमुळे PSL ने भारताच्या लक्झरी रिटेल सेक्टरमध्ये आपले अग्रस्थान मजबूत केले आहे.
PSL मजबूत डिजिटल प्लॅटफॉर्म आणि मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद आणि लंडन यांसारख्या प्रमुख शहरांतील मोठ्या अनुभव केंद्रांचे मिश्रण असलेले एक डिफरेंशिएटेड ऑम्नी-चॅनेल मॉडेल चालवते. आर्थिक वर्ष 25 मध्ये, त्यांच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर 18.57 दशलक्ष युनिक व्हिजिटर्स आले, तर एक्सपिरीयन्स सेंटरने प्रीमियम, पर्सनलाइज्ड सेवा दिली. PSL च्या अग्रणी 50,000 ग्राहकांकडून GMV च्या जवळपास 95.94% योगदान मिळाले. त्यायोगे हे मॉडेल प्रीमियम कस्टमर ऑपटीमायझेशन वर लक्ष केंद्रित करून मजबूत होत आहे. यातून सोयीसोबत वैशिष्ट्यपूर्णता जपण्याची आणि लॉयल्टी व प्रॉफिटॅबिलिटी वाढवण्याची कंपनीची क्षमता अधोरेखित होते.
कंपनीच्या विस्तार धोरणाचा भाग म्हणून PSL ने मुंबईतील फोर्ट आणि दिल्लीतील साऊथ एक्स्टेंशन येथे दोन मोठी एक्सपिरीयन्स सेंटर सुरू केली आहेत. जागतिक रिटेल ठसा आणखी मजबूत करत मुंबईतील लिंकिंग रोड व न्यूयॉर्क, अमेरिका येथे नवीन केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे.
गेल्या काही वर्षात कंपनीने आर्थिक आणि कामकाज स्तरावर मजबूत प्रगती दाखवली आहे. सरासरी ऑर्डर मूल्य आर्थिक वर्ष 23 मधील 39,499 रु. पासून आर्थिक वर्ष 25 मध्ये 56,106 रु. पेक्षा जास्त झाले आहे तर EBITDA मार्जिन याच कालावधीत 0.59% पासून 8.57% पर्यंत सुधारले. आर्थिक वर्ष 23 मध्ये महसुलाच्या 12.88% असलेला विक्री आणि मार्केटिंग खर्च आर्थिक वर्ष 25 मध्ये 6.77% पर्यंत कमी झाला. ग्राहक गुणवत्तेतही सुधारणा झाली असून प्रति ग्राहक सरासरी GMV आर्थिक वर्ष 23 मध्ये 59,023.17 रु. पासून आर्थिक वर्ष 25 मध्ये 83,269.82 रु. पर्यंत वाढला.
कंपनीने आर्थिक वर्ष 25 मध्ये ऑनलाइन चॅनेल्स आणि युके मधील महत्वपूर्ण एक्सपिरीयन्स सेंटर द्वारे 100 हून अधिक देशांतील ग्राहकांना सेवा देत मजबूत आणि वाढणारे आंतरराष्ट्रीय स्थान प्रस्थापित केले आहे. यूएसए, युके, मध्य पूर्व आणि कॅनडा सारख्या बाजारपेठांमध्ये कंपनीने महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले असून आर्थिक वर्ष 25 मध्ये आंतरराष्ट्रीय विक्री GMV च्या 28.38% पेक्षा जास्त योगदान देत होती. भारतीय डिझायनर वेअरच्या जागतिक पातळीवर पोहोचण्यातील अंतर भरून काढून, PSL ने स्वतःचे भारतीय लक्झरी फॅशनसाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये गो टू डेस्टिनेशन म्हणून स्थान निर्माण केले आहे.
कंपनीचे रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस द्वारे हे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे.
ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वीचे आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड) हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.


