पुणे,24 सप्टेंबर 2025 : कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर) बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, रोटरी क्लब ऑफ पुणे लक्ष्मी रोड आणि रिव्हाईव्ह हार्ट फाऊंडेशन तर्फे सीपीआर विषयी जनजागृती उपक्रमाच्या चौथ्या आवृतीचे उद्घाटन शुक्रवार,26 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे.सिंबायोसिस महाविद्यालय येथील सभागृहात सकाळी 11 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ अभिनेते,दिग्दर्शक व लेखक अमोल पालेकर यांसह रिव्हाईव्ह हार्ट फाऊंडेशनच्या राष्ट्रीय समन्वयक डॉ.किंजल गोयल,प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ.जगदीश हिरेमठ व डॉ.सुनील साठे, रोटरी क्लब ऑफ लक्ष्मी रोडच्या अध्यक्ष कोमल शहा,सचिव कमल कोनलाडे,प्रकल्प संचालक दीपा भागवत,प्रकल्प समन्वयक केतन शहा आदी मान्यवर उपस्थित असतील.या उपक्रमादरम्यान 26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2025 या काळात 10,000 हून विद्यार्थी व जेष्ठ नागरिकांना सीपीआर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत याआधीच सार्वजनिक ठिकाणी 11 ऑटोमेटेड एक्सर्टनल डिफ्रिबिलेटर (एईडी) प्रणाली प्रस्थापित करण्यात आली आहे.12 वी एईडी प्रणाली पुणे महानगरपालिका येथे 29 सप्टेंबर 2025 रोजी असलेल्या जागतिक हृदयरोग दिनानिमित्त प्रस्थापित करण्यात येईल.रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष कै.हेमंत शिरगुप्पी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू करण्यात आला होता.


