Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedअॅमेझॉन एमएक्स प्लेयरतर्फे ‘मेड इन इंडिया- अ टायटन स्टोरी’चा पहिला लूक प्रदर्शित...

अॅमेझॉन एमएक्स प्लेयरतर्फे ‘मेड इन इंडिया- अ टायटन स्टोरी’चा पहिला लूक प्रदर्शित – मेक इन इंडियाच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त जे.आर.डी टाटांचा टायटन निर्मितीमागचा विचार उलगडणार

जे.आर.डी. टाटा यांच्या भूमिकेत प्रसिद्ध कलाकार नसिरूद्दीन शहा, तर टाटा समूहासाठी टायटन ब्रँडची उभारणी करणारे अधिकारी झेरक्सेस देसाई यांच्या भूमिकेत जिम सर्भ झळकणार. ‘मेड इन इंडिया – अ टायटन स्टोरी’चे लवकरच अॅमेझॉन एमएक्स प्लेयवर मोफत स्ट्रमिंग

 

 

मुंबई, भारत, 25 सप्टेंबर 2025– अॅमेझॉन एमएक्स प्लेयरने मेड इन इंडिया – अ टायटन स्टोरीचा पहिला लूक प्रदर्शित केला आहे. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ कॅम्पेनच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त ही सीरीज खास तयार करण्यात आली असून त्यात भारतस्थित उद्योगांचा आढावा घेतला जाणार आहे.

या सीरीजमध्ये जे.आर.डी. टाटा आणि टायटनची उभारणी करणारे व या ब्रँडद्वारे देशाला जागतिक स्तरावर स्थान मिळवून देणारे झेरक्सेस देसाई यांचं असामान्य व्हिजन उलगडलं जाणार आहे. या सीरीजच्या नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या पहिल्या लूकमधे टायटनची तरूण टीम आणि जागतिक स्तरावर प्रतिकुल वातावरण असतानाही त्यांनी केलेलं धाडस, त्यांचा दृढनिश्चय व जबरदस्त महत्त्वाकांक्षा दिसून येणार आहे. बोर्डरूम्सपासून कारखान्यापर्यंत या सीरीजमध्ये एका संकल्पनेचं लाखो भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या वारशामध्ये कसं रूपांतर झालं, त्याचा प्रवास पाहायला मिळणार आहे. इतिहास बदलवणारा ठाम विश्वास अधोरेखित करणारा हा पहिला लूक आपल्याला –‘आपण इतिहास घडवला नाही, तर कोण घडवणार?’ या उक्तीची आठवण करून देणारा आहे.

दिग्गज कलाकार नसिरूद्दीन शहा आणि जिम सर्भ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सीरीजमधे आघाडीचे कलाकार दिसणार असून त्यात नमिता दुबे, वैभव तत्ववादी, कावेरी सेठ, लक्ष्वीर सरन आणि परेश गणात्रा यांचा समावेश आहे. प्रभलीन संधू (संस्थारक, अल्मायटी पिक्चर) यांची निर्मिती असलेल्या या सीरीजचे दिग्दर्शन रॉबी ग्रेवाल यांनी केले असून करण व्यास यांनी लिखाण केलेले आहे. मेड इन इंडिया – अ टायटन स्टोरीचे प्रीमियर पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला होणार आहे.

या सीरीजमागचा विचार उलगडताना अॅमेझॉन एमएक्स प्लेयरचे अमोघ दुसाद म्हणाले, ‘अॅमेझॉन एमएक्स प्लेयरमध्ये आम्ही नेहमीच भारताचा नाविन्य आणि चिकाटीचा प्रवास दर्शवणाऱ्या गोष्टींवर भर देतो. मेड इन इंडियाचा प्रवासही त्याच दिशेने जाणारा आहे. भारतीय संवेदनांना साजेशा पद्धतीने गोष्ट सांगण्याला प्राधान्य असल्यामुळे या महत्त्वाकांक्षी फ्रँचाईझीचा पहिला अध्याय टाटा समूहाच्या टायटन ब्रँडला समर्पित असणं स्वाभाविक होतं. ही गोष्ट केवळ टायटन वॉचेससारखा प्रसिद्ध ब्रँढ उभारणाऱ्या औद्योगिक आणि नेतृत्व कौशल्यांपुरती मर्यादित नाही, तर जागतिक स्तरावर आपल्या देशाने दाखवलेल्या विश्वासाचीसुद्धा आहे. ही प्रेरणादायी गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना आम्हाला आनंद होत असून होत त्यांना ती अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर मोफत पाहाता येणार आहे.’

आपल्या भूमिकेविषयी नसिरूद्दीन शहा म्हणाले, ‘जे.आर.डी टाटा यांची व्यक्तीरेखा साकारणं आनंददायी आणि तितकंच जबाबदारीचं काम आहे. त्यांचा भविष्यवेधी स्वभावे आणि मानवता असामान्य होती. आधुनिक भारताची जडणघडण करणाऱ्या अशा गोष्टी मांडता येणं दुर्मीळ आहे. मेड इन इंडियाची भावना केवळ कंपनीपुरती मर्यादित नाही, तर तो कित्येक पिढ्यांना पुरणारा वारसा आहे.’

या सीरीजमधे झेरक्सेस देसाई यांची व्यक्तीरेखा साकारणारे जिम सर्भ म्हणाले, ‘झेरक्सेस देसाई यांचा दूरदृष्टीकोन विलक्षण होता. इतरांना जिथे शंका वाटली, त्यांना तिथे शक्यता दिसली. त्यांची व्यक्तीरेखा साकारण्यातून मला शून्यातून महत्त्वाकांक्षी उद्योग उभारण्याचा विश्वास दिसून आला. ही सीरीज निश्चय, नाविन्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका विशाल संकल्पनेचा अर्थ सांगणारी आहे.’

मेड इन इंडिया – अ टायटन स्टोरी पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार असून ती अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर मोफत स्ट्रीम केली जाईल. त्याचप्रमाणे अॅमेझॉन शॉपिंग अ‍ॅप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही आणि एयरटेल एक्स्ट्रीमवर ही सीरीज पाहाता येईल.

Teaser Link: https://youtu.be/UL6IykXlq20?si=GXCY7o

-1ZxK5ohER

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments