Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedBOSCH घेऊन येत आहे — आता कमी तेल आणि जास्त खुसखुशीतपणा! जर...

BOSCH घेऊन येत आहे — आता कमी तेल आणि जास्त खुसखुशीतपणा! जर तुम्हाला तुमचा डायट मोडण्याची भीती वाटत असेल, तर आता तुम्हाला त्यापासून मुक्ती मिळू शकते. आणि तुम्ही घ्या मनसोक्त चवदार पदार्थांचा आस्वाद.

बी.एस.एच. होम अप्लायन्सेस प्रा. लि., बी.एस.एच. हॉसगेरेटे जीएमबीएच या जागतिक

होम अप्लायन्सेस कंपनीची उपकंपनी, त्यांच्या बहुप्रतीक्षित एअर फ्रायर श्रेणीतील

बॉश क्रिस्पमॅक्स एअर फ्रायरच्या (Bosch CrispMaxx Air Fryers) लाँचिंगची घोषणा

करताना आनंदित आहे. हे उत्पादन खास सणासुदीच्या काळात बाजारात आणले जात आहे.

सिरीज 2 (4 लिटर) आणि सिरीज 6 (7.2 लिटर) या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असलेली

क्रिस्पमॅक्स श्रेणी, भारतातील वेगाने वाढणाऱ्या हेल्दी कुकिंग सेगमेंटमध्ये

बी.एस.एच.च्या (BSH) विस्तार धोरणाचा भाग आहे.

जर्मन इंजिनिअरिंगमधील उत्कृष्टतेचा भारतीय खाद्यसंस्कृतीच्या सखोल

ज्ञानाशी मेळ साधून, बॉश क्रिस्पमॅक्स (Bosch CrispMaxx) एअर फ्रायरला तुमच्या आवडत्या स्ट्रीट

स्नॅक्सपासून ते रोजच्या जेवणापर्यंत प्रत्येक पदार्थाला 95% कमी तेलात

अभूतपूर्व खुसखुशीतपणा आणि चव देण्यासाठी डिझाइन केले आहे. आता तुम्ही

पौष्टिक आणि चांगल्या पद्धतीने पदार्थांची चव आणि अस्सल पोत (texture)

चाखू शकता. बॉश क्रिस्पमॅक्स (Bosch CrispMaxx) नावीन्यपूर्ण आणि पारंपरिक

पद्धतीचे मिश्रण साधून आरोग्य-जागरूक ग्राहकांसाठी कमी दोषमुक्त सणाचा आनंद घेण्याची संधी निर्माण करते. मुंबईचे

खुसखुशीत कांदा भजी, राजस्थानची खस्तादार प्याज कचोरी, तामिळनाडूचे कुरकुरीत

मुरुकू आणि परुप्पू वडा, तसेच उत्तर भारतातील लोकप्रिय आलू टिक्की आणि समोसे

यांसारखे पदार्थ क्रिस्पमॅक्समध्ये (CrispMaxx) बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ

आणि मूळ चवीने परिपूर्ण असे बनतात.

भारतीय पाककृतींच्या सवयी आणि खाद्यपदार्थांच्या आवडीनिवडींचा सखोल अभ्यास करून बॉश

एअर फ्रायरला वेगळे बनवले आहे. तळलेल्या पदार्थांचा आपल्या संस्कृती आणि

भावनांशी एक मजबूत संबंध असला, तरी आरोग्याच्या काळजीमुळे ग्राहक अनेकदा

पदार्थांचा आनंद घेणे आणि आरोग्य यांमध्ये अडकून पडतात. बॉशने यावर तोडगा

काढला आहे. त्यांच्या अनुकूलित (optimized) एअरफ्लो सिस्टीमने (airflow system) खुसखुशीतपणाची

नवीन व्याख्या केली आहे. ही सिस्टीम गरम हवेला समानतेने पसरवून अन्न एकसमान

पद्धतीने शिजवते आणि 95% पर्यंत कमी तेलात कुरकुरीतपणा टिकवून ठेवते. एका

तिसऱ्या, एन.ए.बी.एल-प्रमाणित (NABL-certified) प्रयोगशाळेने नियंत्रित

परिस्थितीत केलेल्या तपासणीत हे निष्कर्ष सिद्ध झाले आहेत. या चाचणीमध्ये 80%

तपासणी करणाऱ्या लोकांना पदार्थ चविष्ट वाटले, तर 79% लोकांना त्यांचा कुरकुरीतपणा

आवडला.

Bosch च्या एअर-फ्रायिंग (air-frying) तंत्रज्ञानामुळे गरम हवा एकसमान पसरते, ज्यामुळे

पदार्थांमधील खुसखुशीतपणा टिकून राहतो आणि जास्तीचे तेल कमी लागते. त्यामुळे

हे उपकरण आरोग्य-जागरूक कुटुंबांसाठी एक आदर्श साथीदार बनते. तुम्ही गोठवलेले

(frozen) स्नॅक्स तळत असाल, भाज्या भाजत असाल किंवा केक बेक करत असाल, बॉश

एअर फ्रायर तुमच्या जेवणाला कमी वेळेत तयार करते आणि त्याचबरोबर पदार्थांची

चव, पोत (texture) आणि पोषणमूल्येही टिकवून ठेवते. स्वयंपाकघरात वाचलेला

वेळ आता कुटुंबासोबत किंवा ताज्या जेवणाचा आनंद घेण्यासाठी घालवता येईल.

या लाँचबद्दल बोलताना बी.एस.एच. होम अप्लायन्सेसचे (BSH Home Appliances) एमडी आणि

सीईओ सैफ खान म्हणाले, “भारतीय स्वयंपाकघरे अशी जागा बनत आहेत, जिथे लोक

परंपरा, नावीन्य आणि जागरूक जीवनाचा समतोल साधत आहेत. कुरकुरीत, स्ट्रीट-स्टाईल

स्नॅक्सची आवड आपल्या संस्कृतीमध्ये खोलवर रुजलेली असली, तरी आजचे ग्राहक अधिक

स्मार्ट आणि आरोग्यदायी पद्धतीने स्वयंपाक करू इच्छितात. बी.एस.एच.मध्ये

(BSH) आम्हाला हे समजते की चांगले जीवन जगणे म्हणजे तुम्हाला आनंद देणारे पदार्थ

सोडून देणे नाही. या सणासुदीच्या काळात क्रिस्पमॅक्स एअर फ्रायर (CrispMaxx Air Fryers)

लाँच करून आम्ही परिपूर्ण आणि प्रामाणिक चवींचा आनंद

घेण्यासाठी जागरूक पाककलेची नवीन व्याख्या तयार करत आहोत. जर्मन

इंजिनिअरिंगची अचूकता आणि स्थानिक पाककलेचे ज्ञान यांचा मेळ साधून, आम्ही

पुढील पिढीच्या घरगुती शेफना (home cooks) सशक्त करत आहोत आणि जागरूक,

आरोग्यदायी खाण्याच्या सवयींच्या जीवनशैली बदलाचे समर्थन करत आहोत.”

 

हा केवळ सामान्य एअर फ्रायर नाही तर हा अधिक एअर फ्रायरपेक्षा, क्रिस्पमॅक्स (CrispMaxx) एक बहुउद्देशीय (multifunctional)

स्वयंपाकघरातील पॉवरहाऊस आहे. यामध्ये एअर फ्राय (air fry), बेक (bake),

रोस्ट (roast), ब्रॉयल (broil), ग्रिल (grill) आणि बेकन (bacon) यासह 6 प्रीसेट

प्रोग्राम आहेत, जे विविध प्रकारच्या स्वयंपाकाच्या गरजा पूर्ण करतात.

 

प्रमुख वैशिष्ट्ये:

सुखद अनुभवासाठी सहज (intuitive) टचस्क्रीन कंट्रोल्स (touchscreen controls)

समान तळणीसाठी ‘शेक रिमाइंडर’ (Shake Reminder) (सिरीज 6) –

पदार्थ एकसमान कुरकुरीत होण्यासाठी, शिजवताना ते हलवणे किंवा

उलटणे महत्त्वाचे आहे. हे वैशिष्ट्य तुम्हाला स्वयंपाक करताना

पदार्थ हलवण्यासाठी किंवा उलटण्यासाठी आठवण करून देते, ज्यामुळे प्रत्येक

पदार्थ एकसमान शिजतो आणि पूर्णपणे कुरकुरीत होतो. यामुळे तुम्हाला वारंवार

पदार्थ तपासण्याची गरज नाही – हा एअर फ्रायर स्वतः याची काळजी घेतो.

स्मार्ट एकात्मिक (integrated) कुकिंग सिस्टीम (cooking system) जी एकाच वेळी 3

पदार्थ तयार करते, ज्यामुळे कुटुंबांसाठी किंवा मोठ्या प्रमाणात स्वयंपाक

करण्यासाठी ते आदर्श आहे. ही स्मार्ट एकात्मता (integration) तुम्हाला

उपकरणाचे सतत निरीक्षण करण्याची गरज कमी करते, एक सोयीस्कर आणि कार्यक्षम

स्वयंपाकाचा अनुभव देते. ‘प्रीहीट’ (Preheat), ‘कूक’ (Cook) आणि ‘कीप

वॉर्म’ (Keep Warm) या 3 मुख्य फंक्शन्समुळे (functions) एअर फ्रायर

स्वयंपाक करण्याची प्रक्रिया सोपी करते.

प्रीहीट (Preheat): तुम्ही स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी एअर

फ्रायरला योग्य तापमानावर आणते, ज्यामुळे उष्णतेचे वितरण एकसमान

होते.

कूक (Cook): स्वयंपाक करताना एकसमान उष्णता देते, ज्यामुळे

पदार्थ व्यवस्थित शिजतात.

कीप वॉर्म (Keep Warm): स्वयंपाक झाल्यावर तुमच्या

जेवणाला योग्य सर्व्हिंग तापमानावर ठेवते, जेणेकरून अन्न थंड

होणार नाही किंवा जास्त शिजणार नाही.

सिरीज 6 (7.2 लिटर) प्रकारामध्ये दोन-स्तरांची काचेची खिडकी (see-through

double-layered glass window) आणि आतमध्ये लाइट आहे, ज्यामुळे वापरकर्ते

फ्रायर उघडल्याशिवाय प्रत्यक्ष वेळेत (real time) स्वयंपाक पाहू शकतात. हे

डिशवॉशर-सेफ (dishwasher-safe) देखील आहे, ज्यामुळे त्याची देखभाल करणे सोपे

आणि जलद होते.

क्रिस्पमॅक्स

एअर फ्रायर (CrispMaxx Air fryer) एल.एफ.जी.बी. प्रमाणित (LFGB certified)

नॉन-स्टिक फूड सेफ्टी कोटिंगसह (Non-stick food

safety coating) येते. हे

प्रमाणपत्र जर्मनीमध्ये एफ.डी.ए. (FDA) मानकांइतकेच आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments