पुणे, दि. 29 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना मार्गदर्शक ठरावी म्हणून दरवर्षी ग्रंथालय संचालनालयामार्फत ग्रंथ निवड समितीच्या शिफारशीवर आधारित “शासनमान्य ग्रंथांची यादी” प्रकाशित करण्यात येते.
सन 2024 या कॅलेंडर वर्षात (दि. 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024) मराठी भाषेत प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांचा शासनमान्य ग्रंथांच्या यादीत समावेश होण्यासाठी संबंधित ग्रंथकार, प्रकाशक यांनी प्रत्येकी एक प्रत विनामूल्य ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, टाऊन हॉल, मुंबई-400001 या पत्त्यावर दि. 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत पाठविणे आवश्यक आहे. प्रकाशित झालेले ग्रंथ यापूर्वीच संचालनालयास पाठविले असल्यास त्यांची पुन्हा प्रत पाठविण्याची आवश्यकता नाही, असे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000


