Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यातील प्रा. रवी पवार यांना ‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी महोत्सवाच्या लोगो...

पुण्यातील प्रा. रवी पवार यांना ‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी महोत्सवाच्या लोगो डिझाईन स्पर्धेत प्रथम पारितोषिक

 

पुणे, दिनांक ३० सप्टेंबर : पुण्यातील प्रसिद्ध अभिनव कला महाविद्यालयातील जाहिरात कलेचे प्राध्यापक व साकेत कम्युनिकेशन्सचे क्रिएटीव्ह डायरेक्टर प्रा. रवी पवार यांनी ‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी महोत्साच्या लोगो डिझाईन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

 

‘वंदे मातरम्’ हे गीत देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक असून आजही ‘वंदे मातरम्’ ऐकताना भारतीयांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित होते. या महान साहित्य कृतीला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने सार्ध शताब्दी महोत्साच्या अंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. या महोत्सवाचा लोगो जनतेतुन तयार व्हावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले होते.

 

या लोगो डीझाईन स्पर्धेत सहभागी झालेल्या शेकडो लोगोंचे आज मुंबई येथे झालेल्या कॅबिनेट बैठकीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण झाले. परीक्षणाअंती प्रा. रवी पवार, पुणे यांच्या लोगोला प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले

.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments