पुणे : कुमठेकर रस्त्यावरील श्री नवनीत मित्र मंडळाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा १०० वर्षांचा इतिहास देखाव्याच्या माध्यमातून उलगडला आहे. देखाव्यात संघ प्रचारकांचे कटआउट फोटो, स्थापनेची माहिती, तसेच संघकार्याचे विविध टप्पे आकर्षक पद्धतीने मांडले आहेत. या उपक्रमाद्वारे संघकार्याबद्दल जनजागृती होऊन तरुण पिढीला प्रेरणा मिळावी, हा मंडळाचा उद्देश आहे.
मंडळाचे अध्यक्ष संतोष फडतरे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्त सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या श्री नवनीत मित्र मंडळाने देखावा सादर केला असून यामध्ये संघाबद्दल ची सर्व माहिती सांगण्यात आली आहे. संघ प्रचारकांचे कटआउट फोटो, संघाच्या स्थापनेची माहिती यामध्ये सांगण्यात आली आहे.
मंडळाचे विशाल काळे, कुणाल जोंधळे, भास्कर काटवटे, आनंद फडतरे, दीपक काळोखे, विनायक ढगे तसेच रेखा कुलकर्णी आणि पूनम खिस्ते यांनी हा देखावा सादर करण्यामध्ये महत्वाची भूमिका होती. कदाचित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिलाच प्रयोग आहे. दृकश्राव्य माध्यमाने दाखवली १५ मिनिटात माहितीपट दाखविण्यात येत आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन संतोष फडतरे यांनी केले आ
हे.


