फ्रॅंकलिन टेम्पलटनने पुण्यात आपल्या नवीन कार्यालय परिसराचे उद्घाटन केले
या प्रदेशात गुंतवणुकीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी या नवीन शाखेची धोरणात्मक पद्धतीने स्थापना करण्यात आली आहे.
फ्रॅंकलिन टेम्पलटनला महाराष्ट्र राज्यात म्यूचुअल फंड्सच्या विकासाची प्रचंड क्षमता दिसली आहे, आणि हे फंड हाऊस राज्यात आपले वितरण नेटवर्क विस्तारित करण्याचा प्रयत्न करत आहे.
महाराष्ट्रातील म्यूचुअल फंड उद्योगाचे AAUM 31.14 लाख कोटी रु. पेक्षा जास्त असून ते मुंबई, पुणे आणि नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये विभागले आहे, ज्यामधून मध्यम ते दीर्घ कालावधीत आशास्पद विकासाचा संकेत मिळतो.1
पुणे, 1 ऑक्टोबर 2025 – आपल्या देशात कार्यरत असलेल्या फ्रॅंकलिन टेम्पलटन (भारत) या एका अत्यंत मोठ्या विदेशी फंड कंपनीने पुण्यात आपल्या नवीन कार्यालय परिसराचे उद्घाटन करून महाराष्ट्रात आपली उपस्थिती विस्तारित करण्यासाठी एक लक्षणीय पाऊल उचलले आहे. ऑफिस नंबर 13, 14, 15, चौथा मजला, CTS 96B, 96 बुलेवार्ड सुवर्णरेखा घोडके चौक, प्रभात रोड, एरंडवणे, पुणे – 411004 येथे योजण्यात आलेल्या उद्घाटन सोहळ्यात फ्रॅंकलिन टेम्पलटन – भारताचे अध्यक्ष श्री. अविनाश सातवळेकर उपस्थित होते.
नव्या शाखेचे उद्घाटन करताना फ्रॅंकलिन टेम्पलटन – भारताचे अध्यक्ष श्री. अविनाश सातवळेकर म्हणाले, “दीर्घ कालीन संपत्ती उभी करण्यासाठी आणि चलनवाढीवर मात करण्यासारखी विविध गुंतवणूक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी म्यूचुअल फंड्स हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. शिवाय, म्यूचुअल फंड्स गुंतवणूकदाराला त्याच्या गुंतवणुकीत विविधता आणण्यास, व्यावसायिक गुंतवणूक कौशल्य, इकॉनॉमिक्स ऑफ सेल, तरलता, कर कार्यक्षमता आणि लहान आकाराच्या तिकिटाचा फायदा करून घेण्यास मदत करतात.”
ते पुढे म्हणाले, “आम्ही इंडिया आणि भारताशी वचनबद्ध आहोत आणि पुण्यात आपली उपस्थिती वाढवत असताना आम्हाला खूप आनंद होत आहे. कारण पुणे ही या उद्योगातील AUM (अॅसेट्स अंडर मॅनेजमेंट) च्या बाबतीत चौथी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. देशभरातील गुंतवणूकदार आमच्यात ऑनलाइन देखील गुंतवणूक करू शकतातच, पण पुण्यातील आमच्या नवीन परिसरामुळे या शहरातील आणि जवळपासच्या गावांतील रहिवासी आता आमच्या गुंतवणूक सेवांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतील.”
जागतिक गुंतवणूक क्षेत्रात 77 वर्षांचा अनुभव असलेल्या फ्रॅंकलिन टेम्पलटनची जगभरात व्यापक उपस्थिती आहे आणि उत्पादनांची एक व्यापक श्रेणी त्यांच्याकडे असून त्याच्या व्यवस्थापनासाठी 1600 पेक्षा जास्त गुंतवणूक व्यावसायिकांची एक समर्पित टीम त्यांच्याकडे आहे. 31 ऑगस्ट 2025 च्या आकड्यांनुसार ही कंपनी जगभरात मिळून 1.64 ट्रिल्यन US डॉलर (अंदाजे 144 लाख कोटी रु.) किंमतीच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करत आहे. फ्रॅंकलिन टेम्पलटनचा भारतात 29 वर्षांचा वारसा आहे आणि भारतात त्यांच्या 36 म्यूचुअल फंड्स योजनांमध्ये मिळून 1.21 लाख कोटी रु. ची सरासरी व्यवस्थापनाखालील मालमत्ता आहे. फ्रॅंकलिन इंडिया लार्ज कॅप फंड (पूर्वीचा फ्रॅंकलिन इंडिया ब्लूचिप फंड), फ्रॅंकलिन इंडिया मिड कॅप फंड (पूर्वीचा फ्रॅंकलिन इंडिया प्राइमा फंड) आणि फ्रॅंकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप फंड या त्यांच्या तीन मुख्य फंड्सचा 30 पेक्षा जास्त वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, तर 18 फ्रॅंकलिन टेम्पलटन फंड्सना सुरू होऊन 20 पेक्षा जास्त वर्षे झाली आहेत.
भारतातील म्यूचुअल फंड उद्योगाची व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) एका दशकात सुमारे सहा पटींनी वाढली आहे. ही AUM 31 ऑगस्ट 2015 रोजी 12.56 ट्रिल्यन रु होती, जी 31 ऑगस्ट 2025 रोजी 75.19 ट्रिल्यन झाली आहे, जी 20% वार्षिक वृद्धी दर दाखवते2. फ्रॅंकलिन टेम्पलटनला महाराष्ट्र राज्यात म्यूचुअल फंड्सच्या विकासाची प्रचंड क्षमता दिसली आहे कारण नवीन गुंतवणूकदारांना भारताच्या विकासाच्या कहाणीत सहभागी व्हायचे आहे. ही कंपनी महाराष्ट्र राज्यात आपले वितरण नेटवर्क विस्तारित करण्याबाबत वचनबद्ध आहे आणि अधिकाधिक गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचण्याचे, त्यांना म्यूचुअल फंड गुंतवणुकीच्या फायद्याविषयी जागरूक करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. सध्या महाराष्ट्रातील म्यूचुअल फंड उद्योगाचे AAUM 31.14 लाख कोटी रु. पेक्षा जास्त असून ते मुंबई, पुणे आणि नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये विभागले आहे, ज्यामधून मध्यम ते दीर्घ कालावधीत आशास्पद विकासाचा संकेत मिळतो.1
1 https://www.amfiindia.com/geographical


