Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedव्यसनमुक्ती प्रचारासाठी महाविद्यालयीन चित्रकला, वकृत्व व निबंध स्पर्धा आयोजित

व्यसनमुक्ती प्रचारासाठी महाविद्यालयीन चित्रकला, वकृत्व व निबंध स्पर्धा आयोजित

पुणे, दि. १ ऑक्टोबर ( जिमाका, वृत्तसेवा) : पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये व्यसनमुक्तीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी दि. ०२ व १५ ऑक्टोबर, २०२५ रोजी महाविद्यालयीन स्तरावर चित्रकला, वकृत्व तसेच निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

 

 

सदर स्पर्धा केंद्रशासनाकडील मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना (NAPDDR) व नशामुक्त भारत अभियान (NMBA) अंतर्गत महाविद्यालयीन तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आयोजित केली जात आहे.

 

 

 

पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या अधिष्ठता, संचालक, प्राचार्य व रजिस्ट्रर यांनी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करावे. महाविद्यालयीन स्तरावर विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर अंतिम निवड करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निश्चित करावेत आणि त्यांची नावे सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालयास दि. 24 ऑक्टोबर पर्यंत सायं. 5 वाजेपर्यंत कळवावीत. असे सहायक आयुक्त, समाज कल्याण विशाल लोंढे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments