पुणे २७ सप्टेंबर २०२५ : हृदय आरोग्यासाठी चयापचयाच्या समस्यांमुळे उद्भवणाऱ्या आजारांपासून दूर राहावे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले . २९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिनानिमित्त हृदय आरोग्याबाबत जागरूकता निर्माण केली जाते.
नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेन्टर येथील इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. सुजित सवदतकर म्हणाले की भारतीय लोकसंख्येमध्ये सह्व्याधींचे वाढते प्रमाण व रक्तवाहिन्यांच्या आजार ( कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस – सिव्हिडी ) हे एक प्रमुख चिंतेचे कारण आहे . चयापचयाच्या विकारांमुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण, कोलेस्ट्रॉल नियंत्रण या शरीराच्या महत्वाच्या कार्यावर विपरीत प्रभाव पडतो आणि परिणामी रक्तवाहिन्यांच्या आजाराचा धोका वाढतो . हृदय आरोग्यासाठी उच्च रक्तदाब, स्थूलता , मधुमेह या त्रिकुटापासून दूर राहावे . यातील प्रत्येक स्थिती हृदयावरील ताण वाढवू शकते आणि एकत्रितपणे हे आजार आणखी हानिकारक ठरू शकतात
ते पुढे म्हणाले की जीवनशैली ही आपल्या हातात आहे, नियमित व्यायाम, समतोल आहार, ताणतणाव व्यवस्थापन, धूम्रपान व तंबाखू च्या सवयीनपासून दूर राहणे , नियमित तपासण्या या सर्व गोष्टींमुळे आपल्या हृदयाचे आरोग्य आपण जपू शकतो .


