०४ ऑक्टोबर २०२५: श्री. सौमित्र पी. श्रीवास्तव यांनी इंडियनऑईलचे संचालक (मार्केटिंग) म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी कंपनीत तीन दशकांहून अधिक काळ विविध महत्त्वाच्या पदांवर कार्य करत एक गौरवशाली कारकीर्द घडवली आहे.
श्री. श्रीवास्तव हे एक प्रख्यात शैक्षणिक व्यक्तिमत्व असून ते आयआयटी रुडकी येथून सिव्हिल इंजिनिअरिंगचे पदवीधर आहेत तसेच एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, मुंबई येथून एक्झिक्युटिव्ह एमबीए प्राप्त केला आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एलपीजी व्यवसाय विभागात चार वर्षांच्या कार्यकाळाने केली आणि त्यानंतर विक्री विभागातील विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले.
ते डाउनस्ट्रीम ऑपरेशन्स, मार्केटिंग आणि स्ट्रॅटेजी या क्षेत्रातील व्यापक अनुभव असलेले एक कुशल कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांची नेतृत्वशैली सहयोगी, परिणामकेंद्रित आणि ग्राहक समाधानावर आधारित आहे. त्यांनी व्यवसाय वृद्धी, नफ्यात वाढ आणि ग्राहक सेवेत सुधारणा घडवून आणत सतत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली ‘ध्रुवा – रिटेल ट्रान्सफॉर्मेशन प्रकल्प’,‘नॉन-फ्युएल कन्क्विनियन्स स्टोअर्स’ तसेच अनेक तंत्रज्ञान आणि डिजिटलीकरण उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले.त्यांनी रिटेल ट्रान्सफॉर्मेशन ग्रुपचे प्रमुख तसेच उत्तर आणि पूर्व भारतातील रिटेल व्यवसाय प्रमुख म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच त्यांनी नवी दिल्ली आणि मुंबईतील विभागीय कार्यालयांचे प्रमुख म्हणून कार्य केले असून पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथील सेल्सचे नेतृत्व केले आहे.
श्री. श्रीवास्तव यांनी महाराष्ट्र आणि गोवा राज्य प्रमुख म्हणूनही काम करत सर्व प्रमुख उत्पादने आणि व्यवसायांचे प्रभावी व्यवस्थापन केले. त्यांच्या नव्या नियुक्तीपूर्वी ते कार्यकारी संचालक (कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी) म्हणून कार्यरत होते, जिथे त्यांनी ग्राहक समाधान वाढविणे आणि संपूर्ण कार्यपद्धतीत कार्यक्षमता वाढविण्यावर भर दिला.
आपल्या नव्या भूमिकेत ते इंडियनऑईलच्या विस्तृत राष्ट्रीय मार्केटिंग नेटवर्कचे धोरणात्मक नेतृत्व करतील, ज्यामुळे कंपनीचे बाजारातील अग्रस्थान अधिक बळकट होईल आणि ग्राहकसेवा अधिक सक्षम होईल. त्यांच्या दृष्टीकोनात चपळ, कार्यक्षम, तंत्रज्ञानावर आधारित आणि विविधीकृत मार्केटिंग इकोसिस्टम तयार करणे समाविष्ट आहे, जी ग्राहककेंद्रित राहील आणि देशाच्या शाश्वत व भविष्याभिमुख इंधनांकडे संक्रमणाच्या प्रवासात अग्रणी भूमिका नि
भावेल.


