Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedचारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका

चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका

पुणे, दि. ६ (जिमाका वृत्तसेवा) : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे कार्यालयाच्यावतीने चारचाकी खासगी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत असून ज्या चारचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असल्यास त्यांनी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० ते दुपारी २:३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा.

 

 

 

अर्ज कार्यालयाच्या परिवहन नवीन नोंदणी विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वत: जमा करावा. डीडी ‘R.T.O., Pune’ यांच्या नावे राष्ट्रीयकृत, अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा व सीलबंद पाकीटात कार्यालयात जमा करावा.

 

 

 

एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येईल. या यादीतील अर्जदारांना लिलावाकरीता जास्त रकमेचा डीडी १० ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात सादर करावा. डीडी किमान रू.३०१/- रूपयांपेक्षा जास्त तसेच ‘R.T.O., Pune’ यांच्या नावे राष्ट्रीयकृत, अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहकार सभागृह, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तींसमोर लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमुद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.

 

 

 

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या तारखेपासून ६ महिन्यांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी शासनजमा होईल. कोणत्याही परिस्थितीत भरलेले शुल्क परत होणार नाही अथवा त्याचे समायोजन होणार नाही.

 

 

 

पसंती क्रमांकाची लिलाव प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पसंती क्रमांक वितरणाकरीता मालिका ऑनलाईन सुरू करण्यात येईल. पसंती क्रमांक आरक्षीत करण्याकरीता https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर, नाव व आधार संलग्नित मोबाईल क्रमांक टाकून नाव नोंदणी करावी व त्यानंतर अर्ज व शुल्क भरणा करून पसंती क्रमांक आरक्षित करता येईल. याकरिता कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही,असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments