प्रसिद्ध वास्तुविशारद शिरीष दसनूरकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन ११ व १२ ऑक्टोबर रोजी दर्पण कला दालन, पत्रकार नगर रस्ता, गोखले नगर येथे सकाळी १० ते संध्याकाळी ७ या काळात आयोजित करण्यात आले आहे. दसनूरकर यांनी काढलेल्या चित्रांचे हे ५ वे प्रदर्शन असून यामध्ये जलरंग व ऐक्रेलिक या माध्यमांचा वापर करून काढलेल्या १०० हून अधिक चित्रांचा समावेश असेल. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न होईल
वास्तुविशारद दसनूरकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन
Share with
Tagged in :