Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedन्याय देवते विषयी चाड असल्यास..धर्मांध राकेश किशोर’वर गृह विभागाने अँट्रासिटी दाखल करून,...

न्याय देवते विषयी चाड असल्यास..धर्मांध राकेश किशोर’वर गृह विभागाने अँट्रासिटी दाखल करून, न्याय व्यवस्थे विषयी आदर सिध्द करावा..!* – काँग्रेस चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी 

 

पुणे दि ७ आक्टों –

‘सनातन धर्माचा’ उच्चार करत, जातीय-धर्मांधतेने आंधळी झालेली व्यक्ती, सर्वोच्च न्यायालयात ‘देशाच्या सरन्यायाधीशां’वर बूट फेकण्याचा निंदनीय हल्ला करण्याचा प्रयत्न करते.. तेंव्हा भारतातील ‘राम मंदिर उभारणीत ‘न्याय व्यवस्थेचे योगदान’ विसरते काय(?) असा संतप्त सवाल काँग्रेसचे वरीष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी निवेदनात केला.

आपल्या निवेदनात ते पुढे म्हणाले की,

४५० वर्ष प्रलंबित ‘राम मंदीर – बाबरी मशीद’ वाद स्वतंत्र व प्रजासत्ताक भारताच्या निर्मिती नंतरच् लोकशाहीचा ३ रा स्तंभ समजल्या जाणाऱ्या ‘न्याय – व्यवस्थेच्या आधारेच्’ शांततेने व कायदेशीर तोडग्याने सुटू शकला, हे स्वतंत्र भारताच्या लोकशाहीची गुण संपन्नता आहे..!

मात्र ‘सनातन धर्मा’चा ढोल पिटणाऱ्या व विकृतीने ग्रासलेल्या प्रवृत्तीला हे दिसू नये वा समजू नये(?) हे सखेद आश्चर्य आहे.

सर न्यायाधीशांवर बूट फेकण्याचा निंदनीय प्रयत्न हा ‘संविधानीक न्याय व्यवस्थेवर’ हल्ला असून, पंतप्रधानांनी केवळ ट्वीट व फोन द्वारे निषेध करून थांबू नये, तर न्याय व्यवस्थेवर जातीय व  धर्मांधतेचे जाणीवपूर्वक दडपण आणणाऱ्या व विकृतीने ग्रासलेल्या राकेश किशोर’ वर केंद्र सरकारने ॲट्रासिटी’चा गुन्हा दाखल करून, संविधानीक न्याय-व्यवस्थे विषयी आदर व सन्मान कृतीने सिद्ध करावा अशी मागणी काँग्रेसचे वरीष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments