शिक्रापुर पाबळ चौक व सणसवाडी चौक दुभाजक तात्पुरते बंद

तारां कित Avatar

पुणे, दि. 13 ऑक्टोबर (जिमाका, वृत्तसेवा): पुणे–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ (एफ) वरील मौजे शिक्रापुर येथील पाबळ चौक तसेच मौजे सणसवाडी येथील चौकातील दुभाजक प्रायोगिक तत्वावर ७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत एक महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद राहतील.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ व १९६ तसेच शासन गृह विभागाच्या दि. १९ मे १९९० च्या अधिसूचनेनुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून सदरचा आदेश जारी केला आहे.

 

अधिसूचना लागू झाल्यानंतर जर काही विधीग्राह्य मुद्दा उद्भवला, तर त्यानुसार सुधारित अधिसूचना काढण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

0000

Tagged in :

तारां कित Avatar