Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedविभागीय लोकशाही दिनात दोन प्रकरणांवर सुनावणी

विभागीय लोकशाही दिनात दोन प्रकरणांवर सुनावणी

,दि.१३ : विभागातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून न्याय्य पद्धतीने व तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. याअंतर्गत आज झालेल्या विभागीय लोकशाही दिनात अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी दोन प्रकरणांवर सुनावणी घेऊन अर्ज निकाली काढले.

 

यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक सुनील फुलारी, अपर आयुक्त तुषार ठोंबरे तसेच विविध विभागांचे विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

 

नागरिकांच्या तक्रारीवर निर्णय घेण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन करण्यात येते. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार निवारण न झालेल्या दोन प्रकरणांवर यावेळी श्रीमती द्विवेदी यांनी अर्जदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली आणि सुनावणी घेतली. यात पुणे व सांगली जिल्ह्यातील प्रत्येकी एका प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली. बेकायदेशीर बांधकाम पाडण्याबाबत व घरकुलाच्या जागेत अतिक्रमण बाबत आदी तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments