नवी दिल्ली आणि मुंबई (भारत) तसेच आर्माँक, न्यूयॉर्क, 17 ऑक्टोबर 2025: भारतातील अग्रगण्य दूरसंचार सेवा प्रदात्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेलने आपल्या नुकत्याच सुरू केलेल्या एअरटेल क्लाऊड सशक्त करण्यासाठी आयबीएम सोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे एअरटेल क्लाऊडची दूरसंचार दर्जाची विश्वसनीयता, उच्च दर्जाची सुरक्षा आणि डेटा रेसिडेन्सी आयबीएमच्या क्लाऊड सोल्युशन्समधील नेतृत्व आणि एआय इंफरन्सिंगसाठी तयार केलेल्या प्रगत इन्फ्रास्ट्रक्चर व सॉफ्टवेअर तंत्रज्ञानासोबत एकत्र येईल.
या भागीदारीद्वारे एअरटेल आणि आयबीएम हे नियमनबद्ध क्षेत्रांतील उद्योगांना त्यांच्या एआय वर्कलोड्सचे अधिक कार्यक्षम स्केलिंग करण्यास सक्षम करतील, ज्यामुळे ऑन-प्रिमाइझ, क्लाऊड, मल्टिक्लाऊड आणि एज अशा सर्व इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इंटरऑपरेबिलिटी मिळेल.
या भागीदारीतून, एअरटेल क्लाऊड ग्राहकांना आयबीएम पॉवर सिस्टिम्स पोर्टफोलिओ एज़-अ-सर्व्हिस स्वरूपात वापरण्याची संधी मिळेल, ज्यात नवीनतम पिढीचे आयबीएम पॉवर ११ स्वयंचलित आणि एआय-रेडी सर्व्हर्स समाविष्ट आहेत. हे सर्व्हर्स बँकिंग, आरोग्यसेवा, सरकारी विभाग आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांतील मिशन-क्रिटिकल अॅप्लिकेशन्ससाठी तयार करण्यात आले आहेत. पॉवर ११ हायब्रिड प्लॅटफॉर्म आयबीएम पॉवर AIX, आयबीएम आई, लिनक्स आणि एसएपी क्लाऊड ईआरपी यांसारख्या महत्त्वाच्या एंटरप्राइज वर्कलोड्सलाही समर्थन देईल. तसेच, या भागीदारीमुळे एसएपी ग्राहकांना आयबीएम पॉवर व्हर्च्युअल सर्व्हर वर त्यांच्या एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंगला एसएपी क्लाऊड ईआरपी मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करण्यास मदत होईल.
गोपाळ विठ्ठल , उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, भारती एअरटेल म्हणाले, “एअरटेल क्लाऊड हे अत्यंत सुरक्षित आणि अनुपालनक्षम बनविण्यात आले आहे, जे एक लवचीक आणि मजबूत क्लाउड प्लॅटफॉर्म म्हणून उद्योगात नवीन मानके तयार करते. आयबीएम सोबतच्या या भागीदारीमुळे आम्ही आमच्या क्लाऊड प्लॅटफॉर्ममध्ये महत्त्वपूर्ण क्षमता वाढवत आहोत, विशेषतः अशा उद्योगांसाठी जे आयबीएम पॉवर सिस्टीम्स वरून स्थलांतर करू इच्छितात आणि एआयसाठी तयार राहू इच्छितात. या भागीदारीमुळे आम्ही आमच्या उपलब्धता झोनची संख्या भारतात चारवरून दहापर्यंत वाढवत आहोत आणि हे सर्व आमच्या नेक्स्ट-जेन सस्टेनेबल डेटा सेंटर्समध्ये होस्ट केले जातील. तसेच आम्ही मुंबई आणि चेन्नई येथे दोन नवीन मल्टिझोन रिजन (MZR) सुरू करणार आहोत.”
रॉब थॉमस, सीनियर वाइस प्रेसिडेंट (एसव्हीपी) आणि चीफ कमर्शियल ऑफिसर, आयबीएम म्हणाले, “आज उद्योगांना आधुनिकीकरण आणि वाढत्या नियामक तंत्रज्ञान आणि एआयच्या गरजा यामध्ये संतुलन साधणे आवश्यक आहे. भारती एअरटेलसोबतच्या आमच्या भागीदारीमुळे, भारतातील ग्राहक आयबीएमचे नाविन्यपूर्ण क्लाऊड उत्पादनांचे लाभ घेऊ शकतात जे महत्त्वाच्या व्यवसायिक गरजा पूर्ण करणारे वर्कलोड्स साठी बनवले आहे.
आयबीएमच्या आयबीएम वॉटसनएक्स आणि रेड हॅट ओपनशिफ्ट एआय वर आधारित एआय इंफरन्सिंग सॉफ्टवेअर स्टॅकमुळे भारतातील ग्राहकांना हायब्रिड क्लाऊड वातावरणात एआय इंफरन्स चालवणे शक्य होईल. या क्षमता आयबीएमच्या एंटरप्राइज-ग्रेड क्लाउड प्लॅटफॉर्म, नाविन्यपूर्ण IaaS आणि PaaS ऑफरिंग, तसेच उत्पादकता वाढविण्यासाठी कोर एंटरप्राइझ वर्कफ्लोमध्ये जनरेटिव्ह एआयच्या प्रभावाला गती देण्यासाठी डिझाइन केलेल्या आयबीएमच्या ऑटोमेशन पोर्टफोलिओसह जोडल्या गेल्या आहेत. ग्राहकांना रेड हॅट ओपनशिफ्ट व्हर्च्युअलायझेशन, रेड हॅट ओपनशिफ्ट आणि रेड हॅट एआय सारख्या रेड हॅट हायब्रिड क्लाऊड सोल्युशन्स सुद्धा वापरता येतील. याशिवाय, आयबीएम चे हायब्रिड क्लाऊड आर्किटेक्चर ग्राहकांना भविष्यातील एआय आणि क्वांटम कंप्युटिंग इनोव्हेशन्स सक्षम करण्यात मदत करेल.
एअरटेल मल्टी झोन रिजन (MZRs) भारतीय उद्योगांना त्यांची डेटा रेसिडेन्सी आवश्यकता पूर्ण करण्यात, महत्त्वाच्या वर्कलोड्स आणि अॅप्लिकेशन्स सतत चालू ठेवण्यात, आणि व्यवसायिक लवचिकता वाढविण्यात मदत करतील. एअरटेल आणि आयबीएम एकत्र येऊन भारतीय उद्योगांना मोठ्या प्रमाणावर डिजिटल इनोव्हेशन वेगाने साध्य
करण्यास सक्षम करेल.