Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे येथे कॉपा मॉलमध्ये म्युनिकसह ऑक्टोबर२०२५चे आयोजन

पुणे येथे कॉपा मॉलमध्ये म्युनिकसह ऑक्टोबर२०२५चे आयोजन

पुणे, 24 ऑक्टोबर २०२५ : कोपा मॉल आणि रिव्हॉल्व्ह पुणे यांनी शहरात म्युनिकसह ऑक्टोबरफेस्ट २०२५चे आयोजन केले आहे. पुणेकरांना येत्या २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी ओक्टोबरफेस्ट २०२५ या ब्रुअरी फेस्टिव्हलची रंगत अनुभवायला मिळेल. हा फेस्टिव्हल गच्चीवर आयोजित केला जातो. दोन दिवसीय खुल्या हवेतील उत्सवाच्या आयोजनाकरिता कोपा मॉलच्या गच्चीला बव्हेरियल शैलीत सजवले जाईल. या फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्तम क्राफ्ट बिअर्स तसेच जगभरातील विविध खाद्यपदार्थांसह लाइव्ह मनोरंजनाचा आनंद घेता येईल. जर्मन परंपरा आणि पुणे शहराची आधुनिक संस्कृती यांचा सुंदर मिलाफ साधत या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण-या प्रत्येकाला एक उत्साही संस्कृती, चव आणि सामुदायिक आनंदाचा अनुभव घेता येईल.

 

ब्रुअरी फेस्टीवलला भेट देणा-या पुणेकरांना डुलल्लेय, एफिन्गट, आयबीसी, यावासुरा, स्टॉनी रिव्हर, किमाया, एचआयके मिड्स, मूनशाइन, हिमाचल हो आणि मुडगर सिडर यांसारख्या नामवंत ब्रुअरीजकडून तयार करण्यात आलेल्या २० हून अधिक प्रकारच्या क्राफ्ट्स बिअर्स मीड्स आणि सायडर्सची चव अनुभवता येईल. सोशल, शॉट, गुड फ्लिपिंग बर्गर्स, एम पॅटीस्टॅरी, हलाओमी, विंग्ज एण्ड कॉ, हंड्रेड बर्गर्स, डुलल्लेय, पिझ्झा एक्सप्रेस, झॉर्को आणि आयसिस्ल या प्रसिद्ध हॉटेल्समधील प्रसिद्ध जागतिक खाद्यपदार्थ चाखता येतील. प्रेत्झेल, सॉसेज, बर्गरसह मिठाई अशा विविध पदार्थांचा समावेश असेल. बिअरसोबत या खाद्यपदार्थांचा आनंद लुटताना एक अविस्मरणीय फेस्टिव्हल अनुभव घेता येईल.

 

दोन दिवसांच्या फेस्टिव्हलमध्ये संगीत आणि मनोरंजनाचाही मनमुराद आनंद घेता येईल. पहिल्या दिवसाची सुरुवात बझ्झ म्युझिक, आंचल एण्ड फरहान, स्टार बॉय आणि स्विश या कलाकारांसह पब क्विझ आणि बिअर गेम्ससह होईल. अखेरच्या दिवशीही फेस्टिव्हलचा उत्साह कायम राहावा म्हणून डिजे तनीषा, अंकल व्हिस्की, रोझमॅरी एण्ड कॅव्हिन, जेडी गुल्ली गँग, यंग मॅडी x यश्तीता हे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करतील. पॉप, रेट्रो आणि कमर्शियल म्युझिकसह दोन दिवस फेस्टिवलची रंगत अनुभवता येईल. मनोरंजनासह खेळांचेही आयोजन केले जाईल. यात बीअर पॉग, स्टीन-होल्डिंग स्पर्धा, प्रेत्झेल खाण्याची चॅलेंज आणि ट्रिव्हिया शॉट्ल यांसारख्या पारंपरिक ऑक्टोबर फेस्ट खेळांचा समावेश असेल.

 

ऑक्टोबर फेस्टमध्ये सहभागी होणा-यांना अस्सल जर्मन अनुभव देण्यासाठी खास जर्मन पद्धतीच्या वेगवेगळ्या वस्तूंचे प्रदर्शन भरवले जाईल. यात जर्मन पद्धतीचा लाकडी चॅलेट, पारंपरिक बॅरल टॅपिंग सभारंभ तसेच विविध साहित्य आणि वस्तूंच्या मदतीने बव्हेरियन संकल्पनेवर आधारित फोटो बूथ असेल. १० वेगवेगळ्या पद्धतींचे जर्मन संस्कृतीचा परिचय करुन देणारे प्रदर्शन, संगीत सोहळे, विविध प्रकारचे क्राफ्ट बिअर आणि जागतिक खाद्यपदार्थांची मेजवानी यामुळे हा कार्यक्रम संस्कृती, समुदाय आणि मौजमजेचा सर्वाच मोठा रुफटॉप सोहळा ठरणार आहे. या फेस्टिवलमधील वेगवेगळ्या कार्यक्रमांत सहभागी होण्याची माफक शुल्क आकारले जाईल.

 

स्थळ: कोपा मॉल

 

तारीख: २५ आणि २६ ऑक्टोबर २०२५

 

वेळ: दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments