Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedआत्मनिर्भर दिवाळी' उपक्रमांतर्गत ५ हजार कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप* महा एनजीओ...

आत्मनिर्भर दिवाळी’ उपक्रमांतर्गत ५ हजार कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप* महा एनजीओ फेडरेशन आणि क्लीन सायन्स यांच्या संयुक्त उपक्रमातून दिवाळीचा आनंद प्रत्येक घरापर्यंत

 

 

पुणे : दिवाळीत आनंदाची गोडी प्रत्येक घरात पोहोचवण्याच्या उद्देशाने महा एनजीओ फेडरेशन आणि क्लीन सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर दिवाळी प्रकल्प राबविण्यात आला. क्लीन सायन्स यांच्या सीएसआर निधीतून आणि फेडरेशनच्या माध्यमातून या उपक्रमांतर्गत एकूण ५ हजार गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.

 

या उपक्रमासाठी पुणे शहरासह आसपासच्या ग्रामीण भागातील अनेक सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने वाटप करण्यात आले. आर्थिक अडचणींमुळे दिवाळी साजरी करता न येणाऱ्या कुटुंबांना या उपक्रमामुळे उत्सवाचा आनंद मिळाला. फराळामध्ये चिवडा, लाडू, शंकरपाळे, शेव, गोमय पणती आदी पारंपरिक पदार्थांचा व वास्तूंचा समावेश होता. लक्ष्मी मंगल कार्यालयात सर्व फराळ तयार करण्यात आला आणि विशेष म्हणजे हे फराळ बनविण्याचे काम गरजू चाळीसहून अधिक महिलांकडून करून घेतले गेले, ज्यामुळे त्यांना रोजगाराची आणि आत्मनिर्भरतेची संधी मिळाली. अशा प्रकारे या उपक्रमाने दोन सामाजिक उद्दिष्टे ज्यामध्ये रोजगारनिर्मिती आणि आनंदवाटप हे एकत्र साध्य केली.

 

दिवाळी फराळ वितरणामध्ये शहरी झोपडपट्ट्यांतील कुटुंबे, ग्रामीण आणि आदिवासी भागातील अत्यंत गरजू व्यक्ती व कुटुंबाचा समावेश होता. या सर्व लाभार्थ्यांपर्यंत स्वयंसेवकांच्या माध्यमातून फराळ पोहोचविण्यात आला. उपक्रमाबाबत महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा म्हणाले, क्लीन सायन्ससारख्या सामाजिक भान असलेल्या कंपन्यांचे सहकार्य मिळाल्यामुळेच आम्ही असे उपक्रम प्रभावीपणे राबवू शकतो. प्रत्येक वर्षी आम्ही काहीतरी नवीन आणि उपयुक्त कार्याद्वारे समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न करतो.

 

उपक्रमाचे संयोजक व संचालक मुकुंद शिंदे म्हणाले, या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे आनंद वाटल्यानेच वाढतो. समाजातील वंचित घटकांपर्यंत दिवाळीचा उत्साह पोहोचवून त्यांनाही या सणाचा आनंद मिळावा, हीच आमची भावना आहे. फेडरेशनचे संचालक योगेश बजाज, अमोल उंबरजे आणि स्नेहा कलंत्री यांनी उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. राहुल जगताप, अपूर्वा कारवा आणि कोमल गांधी यांनी संपूर्ण उपक्रमाचे समन्वयन आणि वितरण व्यवस्थापन जबाबदारीने पार पाडली.

 

‘आत्मनिर्भर दिवाळी’ प्रकल्पाने गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आणि हजारो कुटुंबांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलवला. हा उपक्रम समाजातील सहकार्य, संवेदना आणि सामाजिक जबाबदारी यांचे उत्तम उदाहरण ठरला आहे. पारस महाराज व त्यांच्या २० महाराजांनी सर्व फराळ ४० हून अधिक महिलांसोबत फराळ तयार केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments