पुणे,27 ऑक्टोबर 2025 : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला यांना नुकताच वन इंडिया ॲवॉर्ड 2025 प्रदान करण्यात आला.माय होम इंडिया या संस्थेच्या वतीने दिला जाणारा वन इंडिया ॲवॉर्ड 2025 हा पुरस्कार एका विशेष सोहळ्यात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.मुंबईतील दादर येथील वीर सावरकर सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात तेलंगणाचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा ,राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार, आंध्र प्रदेश भाजपा चे सह-प्रभारी सुनिल देवधर,महाराष्ट्राचे आरएसएस प्रांत प्रचारक मिलिंद मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.
अली दारूवाला हे 2010 पासून आरएसएसमध्ये आणि 2019 पासून भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून काम पाहत आहेत. समाजासाठी अथक योगदान आणि अल्पसंख्यांक समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.


