Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedवंडरफोल्ड २०२५’ या ओरिगामी कला प्रदर्शनाचे आयोजन ओरिगामी मधून साकारलेले अष्टविनायक...

वंडरफोल्ड २०२५’ या ओरिगामी कला प्रदर्शनाचे आयोजन ओरिगामी मधून साकारलेले अष्टविनायक हे यावर्षीच्या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण

पुणे, दि. २७ ऑक्टोबर, २०२५ : इंदुताई टिळक कला केंद्र आणि ओरिगामी मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान ‘वंडरफोल्ड २०२५’ या ओरिगामी कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर वर्ष हे या प्रदर्शनाचे १८ वे वर्ष असून टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे सर्व दिवस सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

गुरुवार दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता ‘वंडरफोल्ड २०२५’ या ओरिगामी कला प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गिताली टिळक यांच्या उपस्थितीत संपन्न होईल, यावेळी श्रीमती रजनी देवल व ओरिगामी मित्रचे स्नेही देखील उपस्थित असतील.

 

‘वंडरफोल्ड २०२५’ या ओरिगामी कला प्रदर्शनाविषयी अधिक माहिती देताना ओरिगामी मित्रचे मिलिंद केळकर म्हणाले, “जपानी पारंपरिक कलेचा एक भाग म्हणून आज जग ओरिगामीला ओळखते. या कला प्रकाराची माहिती भारतीयांना व्हावी, या उद्देशाने पुण्यात इंदुताई टिळक, विश्वास देवल आणि अनिल अवचट यांनी ९० च्या काळात ओरिगामी मित्र हा जपानी कलेचा छंद असणाऱ्या मंडळींचा ग्रुप सुरु केला. मागील ३५ वर्ष दोन वर्षातून एकदा अशा पद्धतीने ओरिगामी मित्र च्या वतीने पुण्यात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे.”

 

यावर्षी लोकमान्य टिळकांचे पणतू आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ दीपक टिळक यांच्या निधनानंतर यावर्षीचे हे प्रदर्शन त्यांना समर्पित असेल तर कागदातून साकारलेले अष्टविनायक हे यावर्षीच्या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण असणार आहे. शिवाय ‘ओरिगामी चा वापर कोणकोणत्या क्षेत्रात होतो’ या संकल्पनेवर आधारित माहितीही या दरम्यान इच्छुकांना मिळू शकेल, असेही केळकर म्हणाले.

 

याबरोबरच एका चौकोनी कागदातून साकारलेले अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी, फुले, अनेक प्रकारचे कंटेनर, ॲक्शन मॉडेल्स आणि ओरिगामी करताना वापरात येणारे विविध प्रकार पाहण्याची व समजून घेण्याची संधीही प्रदर्शनात मिळणार असल्याचे मिलिंद केळकर यांनी सांगि

तले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments