Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedअर्थ बाय एमक्युअरसोबत एम.एस.धोनीचा करार, ‘सो जाओ’ मोहिमेला प्रारंभ - शांत झोप...

अर्थ बाय एमक्युअरसोबत एम.एस.धोनीचा करार, ‘सो जाओ’ मोहिमेला प्रारंभ – शांत झोप आणि उत्तम आरोग्यासाठी मोहिमेचा प्रचार करणार

मुंबई, २७ ऑक्टोबर २०२५: भारतातील आरोग्यसेवा क्षेत्रात अग्रगण्या कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या एर्थ बाय एमक्युअर या ब्रँण्डने अर्थ स्लीप सपोर्ट गमीज हे उत्पादन बाजारात आणले आहे. विज्ञान आणि निसर्गाचा समन्वय साधणा-या या ब्रँण्डने या उत्पादनाच्या प्रमोशनसाठी प्रसिद्ध क्रिकेटपटू एम.एस.धोनी यांच्यासोबत भागीदारीची घोषणा केली आहे. या भागीदारीच्या माध्यमातन ब्रँण्डने सो जाओ ही नवी मोहिम सुरु केली आहे. निद्रानाशामुळे त्रस्त माणसांना शांत झोप मिळावी, या उद्देशाखातर या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरेशी शांत झोप घेतलेल्या लोकांना ताजेतवाने होण्यास, शरीराचा समतोल राखण्यास आणि आपली प्रकृती सुधारण्यास मदत होते.

 

प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू एम.एस.धोनी शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखले जातात. धोनी यांची स्वभाववृत्ती ब्रँण्डच्या मूल्यांना अचूकपणे दर्शवते. अर्थ या ब्रँण्डमध्ये लवचिकता आणि जागरुक जीवनशैलीची मूल्ये जपली जातात. ही मूल्ये धोनी यांच्या स्वभावातही दिसून येतात. ‘सो जाओ’ ही मोहिम जनमानसांत पोहोचावी म्हणून बँण्डने जाहिरातीची निर्मिती केली आहे. धोनी यांच्यावर चित्रित झालेल्या या जाहिरातीत ते स्वतः लोकांना झोपेचे महत्त्व पटवून देताना पाहायला मिळतात. आपल्यासमोर येणा-या प्रत्येकाला ते थांबवतात, चांगली झोप घेण्याची विनंती करतात. हलका श्वास घ्या आणि शांत झोप घ्या, असा आवर्जून संदेश देतात. तुम्हांला रात्री कितीही ताण असला तरीही चांगली आणि शांत झोप महत्त्वाची असते, असे समजावून सांगतात.

 

एमक्युअर फार्माक्युटिकल्सच्या कार्यकारी संचालिका नमिता थापर म्हणाल्या, ‘‘शरीराचे संतुलन व्यवस्थित राहिले की, निरोगी जीवनशैली आत्मसात करता येते. या प्रवासात झोपेची भूमिका महत्त्वाची असते. सो जाओ या उपक्रमाद्वे आम्ही लोकांना हेच सांगू इच्छितो की, पुरेशी विश्रांती घेणे हे स्वतःची काळजी घेण्याचा भाग असतो. जनमानसांत हा संदेश पोहोचवण्यासाठी एम.एस. धोनी आमच्याशी जोडले गेले आहेत. शांत आणि विश्वासार्ह व्यक्तिमत्त्वाचे धोनी सोबत असल्याने या भागीदारीतून आमच्या भूमिकेला साजेशी प्रामिणकता जोडली गेली आहे. आमच्याकडून उत्तम दर्ज्याचे न्यूट्रास्यूटिकल्स उपलब्ध होत असल्याने या उत्पादनातून लोकांना चांगली झोप मिळावी आणि आरोग्यात सुधारणा घडावी.’’ अशी आमची अपेक्षा आहे.

 

माणसाला पुरेशी झोप मिळाली नाही तर आरोग्याच्या गंभीर तक्रारींना सामोरे जावे लागते. अपु-या झोपेमुळे शारिरीक आणि मानसिक ताण निर्माण होतो. सायन्टिफिक रिपॉर्ट्स २०२५मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, आपल्या देशात प्रौढ वयोगटात केवळ सहा तास २० मिनिटे झोप घेतली जाते. या वयोगटातील रात्रीच्या झोपेचे सरासरी तास केवळ ६.९ तास घेतली जाते. यातून बहुतांश प्रौढ वयोगटातील माणसे गरजेपेक्षा कमी झोप घेतात, हे सिद्ध होते.

 

इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायकॉलॉजी(२०२५)मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार हे स्पष्ट झाले की, पुरेशी न मिळाल्याने एकाग्रता, स्मरणशक्ती आणि निर्णयक्षमता यांसारख्या बौध्दिक कार्यांवर नकारात्मक परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर, नैसर्गिकरित्या झोप सुधारण्यासाठी उपयुक्त असलेल्या स्लीप गमीज या उत्पादनाला लोकांनी पसंती दिली आहे. या स्लीप गमीजचा शोध गेल्या वर्षात ६५० टक्क्यांनी वाढला आहे. रात्री पुरेशी झोप मिळावी म्हणून नैसर्गिक उपायांना पसंती दिली जात असल्याचे यातून अधोरेखित होते. मेलाटोनिन आणि मॅग्नेशियम यांसारखे घटक असलेले स्लीप सप्लिमेंट्स चांगल्या झोपेसाठी दैनंदिन जीवनात फार उपयुक्त ठरत आहेत.

 

मेलाटोनिन, एल-थायनाइन, कॅमोमाइल, पॅशन फ्लॉवर यांसारख्या घटकांचा अर्क वापरुन अर्थ स्लीप सपोर्ट गमीजची निर्मिती होते. या घटकांच्या सेवनाने माणसाला शांत झोप मिळते. प्रत्येक गमी निवडक घटकांपासून बनवलेली असून, अमेरिकतील एफडीए मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये त्याची गुणवत्ता तपासणी जाते. हे गमीज १०० टक्के शाखाहारी आहेत. प्रत्येक सर्व्हिंगमध्ये ५ मिलीग्रॅम मेलाटोनिन असते. यात कॅलरीचे प्रमाण अत्यल्प राखले जाते.

 

‘सो जाओ’ मोहिम ही ब्रँण्डचा मुख्य उददेश आणि मुख्य विचार दर्शवते. या मोहिमेद्वारे, लोकांना समतोल जीवनशैलीचा भाग म्हणून शांत आणि चांगल्या विश्रांतीसाठी प्रोत्साहित केले जाते. पुरेशी झोप घेतल्याने शरीराला आराम मिळतो, ताजेपणा मिळतो. पुरेशी झोप मिळाल्याने प्रकृतीत सुधारणा होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments