~ ‘नो कॉन्स्टिपेशन’ (बद्धकोष्ठतेबाबत जाणून घ्या) मोहिमेसह डल्कोफ्लेक्स® विनोदी व संबंधित कथानकाच्या माध्यमातून उत्तम संदेश देत आहे ~
मुंबई, ऑक्टोबर, २०२५: आज भारतातील प्रत्येकी ५ पैकी एका व्यक्तीला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे. डल्कोफ्लेक्स® या भारतातील उत्तम पचनक्रियेमधील लक्सेटिव्ह सोल्यूशनसाठी विश्वसनीय कंपनीने अद्वितीय मोहिम ‘नो कॉन्स्टिपेशन’ लाँच केली आहे. या मोहिमेचा देशातील सर्वात प्रचलित, पण कमी चर्चा केली जाणारी आरोग्यसंबंधित स्थिती ‘बद्धकोष्ठते’बाबत चर्चा सुरू करण्याचा मनसुबा आहे.
ही नवीन संकल्पना बद्धकोष्ठतेसंदर्भात हलक्याफुलक्या विनोदाचा वापर करेल आणि पीडित व्यक्तीची थट्टा न करता विशेषतः महिलांमध्ये बद्धकोष्ठतेबद्दल चर्चेला सुरूवात करेल. बद्धकोष्ठतेचा पुरुष आणि महिलांवर परिणाम होऊ शकतो, पण महिलांना जास्त त्रास सहन करावा लागतो, कारण त्या याबाबत चर्चा करण्यास आणि योग्य उपचार करण्यास इच्छुक नसतात. तसेच शरीररचना, शारीरिक आणि हार्मोनल घटकांमुळे महिलांना जैविकदृष्ट्या बद्धकोष्ठतेचा धोका जास्त असतो.
भारतातील सर्वात सामान्य, पण कमी चर्चा केल्या जाणाऱ्या या आरोग्यसंबंधित स्थितीबाबत जागरूकतेचा प्रसार करण्यासाठी डल्कोफ्लेक्स® आपल्या ‘नो कॉन्स्टिपेशन’ मोहिमेच्या माध्यमातून संदेश प्रसारित करत आहे, जेथे बद्धकोष्ठतेचे वेळेवर उपचार करण्यासाठी विज्ञान-आधारित उपचार पर्यायांचे महत्त्व सांगण्याला चालना देण्यात येईल. विनोदासह प्रासंगिकतेचे एकत्रिकरण करण्यासाठी आणि दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्यासाठी लोकप्रिय स्टॅण्ड-अप कॉमेडियन्स आंचल अग्रवाल, सृष्टी दिक्षित आणि सौम्या वेणूगोपाल या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. लवकरच गुरलीन पन्नू, जेमी लीव्हर , श्रेया रॉय, देखील यात सहभागी होणार आहेत जे ‘बद्धकोष्ठता’ या विषयावर चर्चेला गती देतील. या नवीन दृष्टिकोनासह या मोहिमेचा बद्धकोष्ठतेबाबत अधिक जागरूकतेचा प्रसार करण्याचा मनसुबा आहे, जेथे डल्कोफ्लेक्स® बद्धकोष्ठतेबाबत खुल्या व महत्त्वपूर्ण चर्चेला चालना देत आहे.
नवीन लाँच करण्यात आलेल्या मोहिमेबाबत मत व्यक्त करत ओपेला सीएचसी इंडियाच्या ब्रँड व इनोव्हेशनच्या प्रमुख नुपुर गुरबक्षानी म्हणाल्या, ”सामान्यत: पुरूषांमधील बद्धकोष्ठतेबाबत मोहिमा असतात आणि त्यामधून पीडित व्यक्तीची थट्टा केली जाते, ज्यामुळे ही आरोग्यसंबंधित समस्या क्षुल्लक बनते. आरोग्यसेवा सहजसाध्य करण्याच्या आमच्या मिशनशी बांधील राहत आमच्या ‘नो कॉन्स्टिपेशन’ मोहिमेचा अडथळ्यांना दूर करण्याचा मनसुबा आहे, तसेच आमची महिलांनी या चर्चेमध्ये पुढे येण्याची आणि परिवर्तनकर्ते बनण्याची इच्छा आहे, ज्यामुळे समाजात बद्धकोष्ठतेबाबत चर्चा सामान्य होईल. आपल्याला बद्धकोष्ठतेबाबत समजले तरच त्यावर योग्यरित्या प्रतिबंध ठेवता येईल आणि योग्य उपचार करता येईल.”
या मोहिमेचा सर्वांगीण दृष्टीकोनासह डिजिटल चॅनेल्सपलीकडे जाण्याचा उद्देश आहे, जेथे संपूर्ण भारतात तळागाळापासून क्रियाकलाप व सामुदायिक सहभाग, रेडिओ चॅनेल्सच्या माध्यमातून या मोहिमेचा प्रसार करण्यात येईल. ऑफलाइन चर्चेला चालना देत डल्कोफ्लेक्स®चा शहरी व ग्रामीण भागांमध्ये अधिक प्रमाणात जागरूकतेचा प्रसार करण्याचा मनसुबा आहे.
भारतातील २७६ दशलक्ष व्यक्ती दररोज बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करतात (नेल्सन यूअँडए २०२४ फंक्शनल + पर्पेच्युअल). पण, यापैकी एक-तृतीयांश पीडित व्यक्ती उपचार घेत नाहीत आणि जवळपास निम्मे व्यक्ती घरगुती उपायांवर अवलंबून आहेत, ज्यामुळे समस्येचे निराकरण होणार नाही. अनेक वर्षांपासून लोकप्रिय संस्कृती व जाहिरातींनी बद्धकोष्ठतेबाबत थट्टा केली आहे, रूग्णांच्या खऱ्या संघर्षाला कमी लेखले आहे.


