Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedसरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त  दि. ३१ ऑक्टो. रोजी विशेष परिसंवाद 

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त  दि. ३१ ऑक्टो. रोजी विशेष परिसंवाद 

 

 

 

देशाचे लोहपुरूष अशी ओळख असणारे कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार ३१ ऑक्टोबर रोजी ‘सरदार वल्लभभाई पटेल (चरित्र व काळ)’ या पुस्तकावर आधारित विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे पहिले अध्यक्ष स्व. मामासाहेब देवगिरीकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकावर हा परिसंवाद शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद टिळक मार्ग पुणे येथे संपन्न होणार आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे आयोजित या परिसंवादात कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक व ज्येष्ठ लेखक प्रकाश पवार हे प्रमुख वक्ते असणार आहेत. संस्थेचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments