Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedअवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई

अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई

पुणे, दि. २८ ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) : राज्यात वाळू तसेच इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वापर, वाहतूक व तस्करीचे प्रकार रोखण्यासाठी महसूल व वन विभागामार्फत “महाराष्ट्र गौण खनिज (विकास व विनियमन) नियम, २०१३ लागू करण्यात आले आहेत. या नियमांनुसार संबंधित विभागांमार्फत समन्वयाने कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे.

 

राज्य परिवहन प्राधिकरण, पुणे यांनी कळविल्यानुसार वाळू व इतर गौण खनिजांचे अवैध उत्खनन, वापर व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन अधिनियम तसेच त्याअंतर्गत असलेल्या तरतुदींनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती या कार्यक्षेत्रांमध्ये करण्यात येईल.

 

गुन्ह्यानुसार कारवाईचे स्वरूप पुढीलप्रमाणे ठरविण्यात आले आहे. ▪ पहिला गुन्हा: वाहन अटकाव करून ठेवणे व परवाना ३० दिवसांसाठी निलंबित करणे. ▪ दुसरा गुन्हा: वाहन अटकाव करून ठेवणे व परवाना ६० दिवसांसाठी निलंबित करणे, ▪ तिसरा गुन्हा: वाहन अटकाव करून ठेवणे व परवाना कायमस्वरूपी रद्द करणे.

 

प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून अवैध उत्खनन व वाहतुकीविरुद्ध संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही शिथिलता न दाखवता तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

 

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments