कावासाकी, जपान आणि बेंगळुरू, भारत – तोशिबा डिजीटल सोल्युशन्स कॉर्पोरेशन,ने तोशिबा सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसोबत सहकार्य करुन, ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ दरम्यान भारतातील बेंगळुरू इथे पहिल्या ग्रिडडीबी क्लाउड आयओटी हॅकॆथॉन ची घोषणा केली आहे. ही हॅकेथॉन स्टार्टअप्स, विद्यार्थी आणि डेव्हलपर्सना ग्रिडडीबी ® क्लाउड वापरून रिअल-टाइम आयओटी अॅप्लिकेशन्स विकसित करण्याचे आव्हान स्वीकारण्यासाठी आमंत्रित करत आहे, हा तोशिबाचा मायक्रोसॉफ्ट अझ्युर मार्केटप्लेसवर पूर्णपणे व्यवस्थापित केलेला टाइम-सिरीज डेटाबेस आहे.
यावर्षी एप्रिलमध्ये जगभरात उपलब्ध झालेल्या ग्रिडडीबी ® क्लाउडच्या क्षमतांना प्रोत्साहन देण्यासाठी तोशिबा या हॅकेथॉनचे आयोजन करत आहे. ग्रिडडीबी ® क्लाउड डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी मुख्य डेटा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून काम करते, याद्वारे संस्थांना मोठ्या प्रमाणात डेटा गोळा करणे आणि त्याचे विश्लेषण करणे, मौल्यवान अनुभवांचा शोध घेणे आणि नवीन व्यवसाय उपक्रम चालविणे शक्य होते. जलद डेटा अंतर्ग्रहण, कमी-विलंबात क्वेरींग आणि भक्कम विश्वासार्हता यामुळे ते विविध उद्योगांमध्ये वास्तविक वेळेत विश्लेषण आणि मिशन-क्रिटिकल ऑपरेशन्सना समर्थन देण्यासाठी एक वेगळे स्थान राखून आहे.
हॅकेथॉनमधील सहभागींना स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, ऊर्जा, गतिशीलता आणि आरोग्यसेवा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये वास्तविक जगातील आव्हानांना तोंड देणारे IoT उपाय विकसित करण्याची आणि त्यांचे प्रारुप तयार करण्याची संधी मिळेल. ऑनलाइन सादर केलेल्या समूहातून शीर्ष पाच संघांची अंतिम फेरीत निवड केली जाईल. एकदा निवड झाल्यानंतर, त्यांना ऑनसाईट कार्यक्रमादरम्यान GridDB® अभियंत्यांकडून थेट तांत्रिक समर्थन आणि मार्गदर्शन मिळेल, जेणेकरुन त्यांना टाइम-सिरीज डेटा व्यवस्थापन आणि क्लाउड-नेटिव्ह डेव्हलपमेंटमध्ये त्यांची कौशल्ये वाढविण्यास मदत होईल. अंतिम फेरीतील सहभागी त्यांच्या संकल्पनेचे पुरावे परीक्षकांच्या पॅनेलसमोर सादर करतील, त्यामधून उत्कृष्ट प्रकल्प अतिरिक्त समर्थन आणि मान्यता मिळण्यास पात्र सहभागी निवडले जातील.
संपूर्ण हॅकेथॉनमध्ये, सहभागींना नवीनतम IoT तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल, सहकारी नवोन्मेषकांशी संपर्क साधता येईल आणि मौल्यवान अभिप्राय मिळवता येतील. हा कार्यक्रम तांत्रिक कौशल्ये वाढवण्याची, व्यवसायिक नेटवर्कचा विस्तार करण्याची आणि IoT क्षेत्रात अर्थपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी एक अनोखी संधी देणारा आहे.
अर्ज आता १४ डिसेंबर २०२५ पर्यंत करता येतील. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी, कृपया इथे भेट द्या: https://griddb-iot-hackathon.devpost.com/?utm_source=TDSL&utm_medium=webpage&utm_campaign=topics
—


