पुणे, दि. 27 ऑक्टोबर (जिमाका, वृत्तसेवा) : कृषि समृद्धी योजने अंतर्गत सन 2025-26 या वर्षाकरिता फवारणीकरिता किसान ड्रोन वाटप करणे, यंत्राद्वारे भात लागवडीस प्रोत्साहन देणे व सेंद्रीय पध्दतीने केळी, स्टॉबेरी व इतर फळपिके उत्पादनासाठी 10 ड्रम पद्धतीचा वापर करणे या तीन योजनांसाठी इच्छुक शेतकऱ्यांकडून 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
या योजनांअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची निवड सोडतीद्वारे होणार असून निवडीनंतर 10 दिवसांत कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहील. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
00000


