Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedतालचक्र युवाच्या दुसऱ्या दिवशी रंगले कृष्णा साळुंके यांचे ‘शिवतांडव’ आणि अंजली-नंदिनी गायकवाड...

तालचक्र युवाच्या दुसऱ्या दिवशी रंगले कृष्णा साळुंके यांचे ‘शिवतांडव’ आणि अंजली-नंदिनी गायकवाड भगिनींचे शास्त्रीय गायन

 

भारदस्त पखवाज वादनाने पुणेकर रसिक भारावले; गायकवाड भगिनींची रसिकांवर स्वर-मोहिनी

 

पुणे, दि. ३१ ऑक्टोबर, २०२५ : पं. नानासाहेब पानसे यांच्या पखवाज घराण्याचे युवा, आश्वासक पखवाज वादक कृष्णा साळुंके यांनी सादर केलेले भारदस्त ‘शिवतांडव’ आणि ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या विजेत्या असलेल्या अंजली व नंदिनी गायकवाड या गायक भगिनींनी सादर केलेले शास्त्रीय गायन यामुळे तालचक्र युवाचा आजचा दुसरा व शेवटचा दिवस लक्षवेधी ठरला.

 

तालवाद्यांचा देशातील एक महत्त्वाचा संगीत महोत्सव म्हणून सर्वपरिचित असलेला तालचक्र महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाला विधी महाविद्यालय रस्त्यावरील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर मधील अॅम्फी थिएटर येथे सुरुवात झाली. महोत्सवाचे हे १३ वे वर्ष असून यावर्षी पुनीत बालन समूहाचे सहकार्य महोत्सवास लाभले आहे. महोत्सवाचे आयोजक व सुप्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे आज उपस्थित होते. यावर्षी तालचक्र महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी सर्वांना प्रवेश देण्यात येईल.

 

तालचक्र युवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात कृष्णा साळुंके यांच्या ‘शिवतांडव’ या कार्यक्रमाने झाली. खंड जातीतील परण सादर करीत त्यांनी कार्यक्रम सुरु केला. यानंतर चौतालात विविध बंदिशी त्यांनी प्रस्तुत केल्या. ‘सोहम हर डमरू बाजे…’ व ‘ओम नम: शिवाय…’ या रचना त्यांनी सादर केल्या. कृष्णा यांना ज्ञानेश्वर अंडील व गोपाळ पांचाळ यांनी पखवाज, यशवंत थिट्टे यांनी संवादिनी, सुरंजन खंडाळकर यांनी गायन तर पृथ्वीराज कदम यांनी मंजिरा साथ केली.

 

यानंतरच्या दुसऱ्या सत्रात ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या विजेत्या असलेल्या अंजली व नंदिनी गायकवाड या गायक भगिनींनी शास्त्रीय गायन सादर करत उपस्थितांवर स्वर-मोहिनी घातली. राग यमनच्या बहारदार प्रस्तुतीने त्यांनी गायनाला सुरुवात केली ‘आदी देव महादेव…’ ही तीन तालातील बंदिश आणि तराना त्यांनी गायला. यानंतर ‘सावळली धून विठ्ठल होऊन…’, ‘मन मंदिरा…’ या रचना त्यांनी पेश केल्या. निर्गुणी भजन, ‘धन्य धन्य भीमातीर…’, ‘माझे आई रखुमाई…’, हे अभंग त्यांनी सादर केले. ‘धन्य भाग सेवा का अवसर पाया…’ या रचनेने त्यांनी समारोप केला. या दोघींना सोहम गोराणे यांनी तबला, ओंकार इंगवले यांनी पखवाज तर अंगद गायकवाड यांनी संवादिनीवर साथसंगत केली. मिलिंद कुलकर्णी यांनी महोत्सवाचे सूत्रसंचालन केले.

 

उद्या शनिवार दि. १ नोव्हेंबर रोजी सायं ५ वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे अजराडा घराण्याच्या सातव्या पिढीचे प्रतिनिधी, प्रसिद्ध तबलावादक उस्ताद अक्रम खान आणि पं. किशन महाराज यांचे शिष्य व बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक पं. अरविंद कुमार आझाद यांची तबला जुगलबंदी मुख्य तालचक्र महोत्सवात रसिकांना अनुभविता येईल. यानंतर विवेक राजगोपालन यांच्या ‘ता धोम…’ प्रोजेक्ट या कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. यामध्ये हिप हॉप संगीत व भारतीय संगीताचा एक अनोखा मेळ रसिकांना अनुभवता येईल. पद्मश्री उस्ताद शाहीद परवेझ यांच्या सतारवादनाने १३ व्या तालचक्र महोत्सवाचा समारोप होईल. यावेळी पद्मश्री पं. विजय घाटे हे तबला साथ करतील. यावर्षीच्या तालचक्र महोत्सवासाठी पुनीत बालन समूहा सोबतच बढेकर समूह, वेनकॉब, एनईसीसी, लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी, बरवा स्किन थेरपी, फिब्रो इंडिया, वेंकीज, मस्कॉट आणि गिरिकंद हॉलिडेज यांचे सहकार्य ला

भले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments