Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedवैकुंठ चतुर्दशीला तुळशीबाग राममंदिरात गाभाऱ्यात जाऊन घेता येणार दर्शन श्री रामजी संस्थान...

वैकुंठ चतुर्दशीला तुळशीबाग राममंदिरात गाभाऱ्यात जाऊन घेता येणार दर्शन श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे आयोजन

पुणे : ऐतिहासिक तुळशीबाग श्रीराम मंदिरात वैकुंठ चतुर्दशीला थेट गाभाऱ्यात जाऊन प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. मंगळवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी वैकुंठ चतुर्दशी असून वर्षातून एकदा भाविकांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येते, अशी माहिती श्रीरामजी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले यांनी दिली.

 

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम मंदिरात दरवर्षी वैकुंठ चतुर्दशीला आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई देखील केली जाते. यानिमित्ताने संस्थानचे कार्यकारी विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, विश्वस्त भरत तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार देखील सहभागी होतो.

 

पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामधे विविध धार्मिक कार्यक्रम होतात. यंदा झालेल्या श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६४ वे वर्ष होते. आता वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्ताने देखील मंदिर सजविण्यात येणार असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments