Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिसान मोटर इंडियाकडून मासिक तत्वावर देशांतर्गत विक्रीत ४५% वाढीची नोंद, ऑक्टोबर २०२५...

निसान मोटर इंडियाकडून मासिक तत्वावर देशांतर्गत विक्रीत ४५% वाढीची नोंद, ऑक्टोबर २०२५ मध्ये ९६७५ युनिट्सची एकत्रित विक्री

 

 

 

• ऑक्टोबर २०२५ मध्ये एकूण २४०२ युनिट्सची देशांतर्गत विक्री, सप्टेंबर २०२५ च्या तुलनेत ४५% जास्त

• ९६७५ युनिट्सची एकत्रित विक्री आणि ७२७३ युनिट्सची निर्यात

• न्यू निसान मॅग्नाइटच्या नेतृत्वाखाली १.२ दशलक्ष एकत्रित निर्यातीचा टप्पा

• डीलर भागीदार ३ रोमांचक नवीन मॉडेल अनावरणासाठी सज्ज.

 

गुरूग्राम, १ नोव्हेंबर २०२५: निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एनएमआयपीएल) ने ऑक्टोबर २०२५ मध्ये ९६७५ युनिट्सची एकत्रित विक्री नोंदवली. त्यातून मासिक तत्वावर ४५% वाढ दर्शवते. कामगिरीतील ही वाढ नवरात्र, दसरा आणि दिवाळीदरम्यान नवीन निसान मॅग्नाइटची जोरदार मागणी दर्शवते. त्याचे एक कारण सरकारने जाहीर केलेला जीएसटी दर कपातीचा सकारात्मक परिणाम आहे.

 

देशांतर्गत घाऊक विक्री २४०२ युनिट्सवर पोहोचली. नवीन निसान मॅग्नाइटची मागणी मजबूत होती आणि तिची निर्यात ७२७३ युनिट्सवर पोहोचली. त्यामुळे जागतिक निर्यात केंद्र म्हणून निसान इंडियाचे स्थान बळकट झाले. कंपनीने अलीकडेच त्यांच्या १२ लाखाव्या वाहनाच्या निर्यातीचा उत्सव साजरा केला आणि आपण “मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड” तत्वज्ञानाशी वचनबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

 

निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणाले: ऑक्टोबर महिना ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी तसेच निसान मोटर इंडियासाठी चांगला महिना होता. याचे मुख्य कारण भारत सरकारने जाहीर केलेल्या जीएसटी दरातील सुधारणांमुळे सणांचा उत्साह द्विगुणित झाला. निसान मॅग्नाइट – आमची पुरस्कार विजेती, ४० मानक सुरक्षा वैशिष्ट्यांसह जीएनसीएपी ५-स्टार रेटेड एसयूव्ही – देशभरातील ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. आमच्या १० वर्षांच्या विस्तारित वॉरंटी आणि जीएसटी फायद्यांच्या अतिरिक्त मूल्यामुळे तिचे आकर्षण आणखी वाढले आहे. कुरो स्पेशल एडिशन आणि नवीन मेटॅलिक ग्रे व्हेरिएंटला मिळालेला उत्साही प्रतिसाद आमच्या ग्राहकांचा निसान ब्रँडशी असलेल्या खोल भावनिक संबंधाचे प्रतिबिंब दर्शवतो. अलीकडेच आम्ही मॅग्नाइट बीआर१० ईझेड-शिफ्ट (एएमटी) समाविष्ट करण्यासाठी आमच्या सीएनजी रेट्रोफिटमेंट प्रोग्रामचा विस्तार देखील केला आहे. तो ग्राहकांना आणखी लवचिकता आणि मूल्य देतो.

 

आम्ही उत्सवाच्या हंगामापूर्वी डीलर इन्व्हेंटरीमध्ये मासिक पातळीवर घट करण्यावर सातत्याने लक्ष केंद्रित करत आहोत. त्यामुळे किरकोळ विक्रीत वाढ आणि पुरवठ्याचा वेग वाढला आहे. एनएमआयपीएल नेटवर्क आता आगामी रोमांचक उत्पादनांचे स्वागत करण्यासाठी विस्तारत आहे. त्यात बहुप्रतिक्षित निसान टेक्टॉन, ७-सीटर बी-एमपीव्ही आणि ७-सीटर सी-एसयूव्ही यांचा समावेश आहे. डीलर भागीदार चांगली तयारी करत असून आशावादी आहेत आणि ग्राहकांच्या सहभागात मोठी वाढ अपेक्षित आहे. विस्तारते डीलर नेटवर्क आणि सातत्यपूर्ण ब्रँड अनुभव, नावीन्यपूर्ण आणि सुलभ गतिशीलता उपाययोजना देण्यावर लक्ष केंद्रित करून, निसान आमच्या ‘एक कार, एक जग’ धोरणाअंतर्गत भारतभर आणि ६५+ निर्यात बाजारपेठांमध्ये ग्राहकांना आनंद देण्यासाठी वचनबद्ध आहे.”

 

ग्राहकांना जीएसटीचा संपूर्ण लाभ देऊन निसानने न्यू निसान मॅग्नाइटच्या किमती १ लाख रूपयांपर्यंत कमी केल्या. न्यू निसान मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशन आणि नवीन मेटॅलिक ग्रे बाजारात आल्याने उत्साहात भर पडली, देशभरातील ग्राहकांकडून त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला.

 

आपल्या ६५+ देशांमधील उपस्थिती आणि विस्तारित जागतिक अस्तित्वासह मेड-इन-इंडिया न्यू निसान मॅग्नाइट निसानच्या “एक कार, एक जग” तत्वज्ञानाचे मूर्त स्वरूप देत असून ते जे भारतापासून जगापर्यंत गुणवत्ता, नावीन्य आणि उत्कृष्टतेचे प्रतीक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या www.nissan.in.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments