Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedडिव्हाईन आर्ट इन्स्पायर्स’ चित्रप्रदर्शन ५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान भू मातेला...

डिव्हाईन आर्ट इन्स्पायर्स’ चित्रप्रदर्शन ५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान भू मातेला समर्पित अनोखे चित्रप्रदर्शन पाहण्याची रसिकांना संधी

पुणे, दि. ३ नोव्हेंबर, २०२५ : पुण्यातील युवा चित्रकार, छायाचित्रकार आणि डिझायनर असलेल्या देविका नाडगौडा यांच्या ‘डिव्हाईन आर्ट इन्स्पायर्स’ या पहिल्या एकल चित्रप्रदर्शनाचे आयोजन येत्या बुधवार दि. ५ ते रविवार दि. ९ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे. घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे सर्व दिवस सकाळी ११ ते सायं ७ दरम्यान रसिकांना हे प्रदर्शन विनामूल्य पाहता येणार आहे. भू माता अर्थात मदर अर्थ ही या प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना असून यावर आधारित तैलचित्रे व अॅक्रॅलिक चित्रे,या प्रदर्शनात रसिकांना पाहता येणार आहेत.

 

भारतीय संस्कृतीत भू मातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोमाता, गंगामाता यानंतर देशात सर्वत्र भू मातेची पूजा महत्त्वाची मानल्या गेली आहे. हीच संकल्पना घेता देविका यांनी निसर्ग आणि आपले संरक्षणकर्ती भू माता यांचा मेळ साधत ही चित्रे रेखाटली आहेत.

 

निसर्गमातेबद्दलचे आकर्षण आणि श्रद्धेने मला ही चित्रे काढण्याची प्रेरणा मिळाली असे सांगत देविका नाडगौडा म्हणाल्या, “भारतीय संस्कृतीत, पृथ्वीला सर्व जीवसृष्टीचे पोषण करणारी देवी माता म्हणून खूप आदराचे स्थान आहे. भू मातेला कायमच सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व दिल्या गेले आहे. ती संस्कृतीच्या टिकाऊ शक्तींचे एक मूर्त रूप मानल्या गेली आहे. भू माता मानवाला संयम व सहनशीलता शिकवते असे म्हणतात. पृथ्वीची पूजा करण्याची प्रथा सनातन धर्माचा एक प्राचीन भाग आहे, हेच लक्षात घेत या संकल्पनेवर आधारित चित्रांचे प्रदर्शन आम्ही आयोजित केले आ

हे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments