नवी मराठी सीरीज बाई तुझ्यापायी मुळे घडून येत असलेला बदल साजरा करण्यासाठी मराठी ZEE5 ने विचारांना चालना देणारे एक म्युरल मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसवले आहे. ही सीरीज धाडस, व्यवस्थेविरोधात आवाज उठवणे आणि क्रांती घडवणे अशा संकल्पनांवर आधारित असून त्याला आदरांजली वाहण्यासाठी हे म्युरल उभारण्यात आले आहे.
ही आकर्षक कलाकृती सीरीजची भावना मांडणारी आहे – या सीरीजमधे एक तरुण मुलगी फळ्यापुढे उभी राहून मुलं – 20, मुली – 1 असं वाचताना दिसते. हा प्रसंग देशभरातील शाळांमधे दिसून येणाऱ्या लिंगभेदाची आठवण करून देणारा आहे. तिच्याजवळच अहिल्या आणि तिची आई लक्ष्मी यांची प्रतिमा दिसते – प्रेम, जिद्द आणि चिकाटीनं जोडल्या गेलेल्या दोन स्त्रिया समाजानं घालून दिलेल्या मर्यादा पार करून स्वप्नं पाहाण्याचं धाडस करत असतात. हे म्युरल बाई तुझ्यापायी या सीरीजच्या संकल्पनेला आदरांजली वाहणारं आहे – ही कथा प्रेक्षकांना विचार करण्याची, मागे वळून पाहण्याची आणि स्त्रियांसाठी छोटंसं स्वप्नही खूपदा का इतकं अवघड असतं असा विचार करायला लावणारी आहे.
निपुण धर्माधिकारी यांचं दिग्दर्शन आणि साजिरी जोशी, क्षिती जोग, सिद्धेश धुरी यांचा जबरदस्त अभिनय असलेली बाई तुझ्यापायी ही सीरीज 1990च्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या एका लहानशा खेड्यात घडते. या सीरीजमधे अहिल्या नावाच्या एका लहान मुलीची समाज बंधनं घालत असतानाही शिक्षण सुरू ठेवण्याची व डॉक्टर बनण्याची जिद्द दिसून येते. तिच्या जगात मुलींसाठी शिक्षण बऱ्याचदा अनावश्यक मानलं जात असतं – आणि अहिल्या व तिच्यासारख्या कितीतरी मुलींना पाळी सुरू झाल्यावर शाळा सोडावी लागते. या पार्श्वभूमीवर अहिल्याचा ज्ञानाचा ध्यास शांतपणे सुरू राहातो.
प्रदर्शित झाल्यापासून बाई तुझ्यापायी सीरीजला प्रेक्षक तसेच समीक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक या सीरीजची अस्सलता, भावनिक खोली आणि पितृसत्ताक व्यवस्थेला छेद देऊ पाहाणाऱ्या आई- मुलीच्या नात्याचं चित्रण यांचं कौतुक करत आहेत. या सीरीजद्वारे लिंगभेद, शिक्षण आणि ग्रामीण भारतातील अगणित मुलींच्या खुडल्या गेलेल्या स्वप्नांविषयी चर्चा होत आहे.
क्षिती जोग म्हणाल्या, ‘बाई तुझ्यापायी ही सीरज माझ्या करियरमधल्या सर्वात अर्थपूर्ण अनुभवांपैकी एक आहे. हा अनुभव म्युरलद्वारे प्रतीत होताना पाहाणं आनंददायी आहे. ही केवळ अहिल्याची कथा नाही, तर स्वतःला जे आवडतं ते करू पाहाणाऱ्या प्रत्येक स्त्रीची, प्रत्येक आईची आहे. ही केवळ एक कलाकृती नाही, तर ते जिद्द, प्रेम आणि बदलावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे. लक्ष्मीमधली आई विश्वास आणि स्वातंत्र्य यांच्यात अडकलेली आहे. मला आशा आहे, की ही सीरीज प्रेक्षकांना एखादं लहानसं धाडसही कित्येक पिढ्यांना प्रकाश देऊ शकतं याची आठवण करून देईल.’
साजिरी जोशी म्हणाल्या, ‘आज या सुंदर म्युरलपुढे उभं राहाताना माझं मन भावूक झालं आहे. बाई तुझ्यापायी ही सीरीज धाडस आणि बदलाचा प्रवास मांडणारी आहे – केवळ अहिल्याचाच नव्हे, तर रूढ व्याख्यांवर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्या प्रत्येकीचा प्रवास याच चित्रित झाला आहे. तिची गोष्ट अशाप्रकारे एखाद्या कलाकृतीद्वारे मांडली जाणं हे जणू तिचा आवाज पडद्याबाहेर पडून प्रत्यक्ष युगात श्वास घेत असल्यासारखं आहे. हे म्युरल प्रश्न उभे करणाऱ्या आणि भीतीवर मात करत धाडस दाखवणाऱ्या प्रत्येक स्त्रीची जिद्द साजरं करणारं आहे. मला आशा आहे, की हे म्युरल लोकांना खरा बदल एका धाडसी प्रश्नातून सुरू करण्याची प्रेरणा देणारं आहे
.’


