Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedइंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या सीझन 2 साठी ‘रिट्झ लेन’ अधिकृत लाइफस्टाइल फर्निचर...

इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या सीझन 2 साठी ‘रिट्झ लेन’ अधिकृत लाइफस्टाइल फर्निचर पार्ट

प्रीमियम आउटडोअर लाइफस्टाइल फर्निचर ब्रँड ‘रिट्झ लेन’ आता ISRL च्या आगामी रेसमध्ये फॅन्स आणि हॉस्पिटॅलिटी अनुभव अधिक उंचावणार आहे.

 

● या भागीदारीअंतर्गत, रिट्झ लेनची अत्याधुनिक व आकर्षक डिझाइन्स ISRLच्या फॅन पार्क्स, VIP झोन्स आणि हॉस्पिटॅलिटी लाउंजेसमध्ये सादर केली जाणार आहेत.

 

मुंबई, 6 नोव्हेंबर 2025 – जगातील पहिली फ्रँचायझी-आधारित सुपरक्रॉस लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) ने सीझन 2 साठी ‘रिट्झ लेन’ला अधिकृत लाइफस्टाइल फर्निचर पार्टनर म्हणून जोडल्याची घोषणा केली आहे. या भागीदारीमुळे हैदराबाद आणि कोझिकोड येथे होणाऱ्या ISRL च्या रेसवेळचा फॅन एक्सपिरियन्स आणि हॉस्पिटॅलिटी अनुभव अधिक आकर्षक आणि प्रभावी होणार आहे.

 

रिट्झ लेनचे प्रीमियम आउटडोअर फर्निचर फॅन पार्क्स, VIP बॉक्सेस आणि हॉस्पिटॅलिटी लाउंजेस मध्ये वापरण्यात येणार आहे, ज्यामुळे ISRL च्या रेस अनुभवात सोय, आराम आणि एलिगन्स यांचा समन्वय साधला जाईल. मोटरस्पोर्ट, लाइफस्टाइल आणि एंटरटेनमेंट यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्याच्या ISRL च्या दृष्टिकोनाशी ही भागीदारी पूर्णपणे सुसंगत आहे.

 

या भागीदारीबद्दल बोलताना रिट्झ लेनचे संस्थापक आणि संचालक, पार्थ पटेल म्हणाले : “रिट्झ लेनमध्ये आमची दृष्टी नेहमीच अशी राहिली आहे की आम्ही डिझाइन, टिकाऊपणा आणि आराम यांचा संगम साधणारे जागतिक दर्जाचे लाइफस्टाइल फर्निचर तयार करावे. ISRL सोबतची भागीदारी आम्हाला ही दृष्टी प्रत्यक्षात उतरवण्याची संधी देते — आणि तेही भारतातील सर्वात रोमांचक क्रीडा प्लॅटफॉर्मवर. आम्ही ISRL सीझन 2 चा भाग बनत असल्याचा आनंद आहे आणि हजारो चाहत्यांसमोर व अतिथींसमोर रिट्झ लेनची सिग्नेचर डिझाइन्स सादर करण्यास उत्सुक आहोत.”

 

ISRL चा सीझन 2 तीन शहरांमध्ये आयोजित केला जात आहे, ज्यामध्ये १८ हाय-ऑक्टेन रेस, ६ फ्रँचायझी टीम्स आणि ३६ जागतिक व भारतीय रायडर्स सहभागी होत आहेत. पुण्यातील दमदार ओपनिंगनंतर, हा स्पर्धात्मक प्रवास पुढे हैदराबादमध्ये 6 डिसेंबर 2025 रोजी जीएमसी बालयोगी अ‍ॅथलेटिक स्टेडियम, गाचीबोवली येथे होणाऱ्या राऊंड 2 आणि शेवटी 21 डिसेंबर 2025 रोजी कालीकटमधील ईएमएस कॉर्पोरेशन स्टेडियममध्ये ग्रँड फिनालेसह पूर्ण होईल.

 

वीर पटेल, प्रमोटर, इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग, म्हणाले : “ISRL केवळ रेसिंगपुरते मर्यादित नाही — चाहत्यांना एक अपूर्व एंटरटेनमेंट अनुभव देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. रिट्झ लेनसोबतची भागीदारी आमच्या फॅन पार्क्स आणि हॉस्पिटॅलिटी झोन्समध्ये प्रीमियम आराम आणि सौंदर्याची भर घालते, ज्यामुळे सीझन 2 चा वातावरण अधिकच उंचावेल. आम्ही रिट्झ लेनचे ISRL परिवारात स्वागत करताना आनंदित आहोत.”

 

सीझनमध्ये स्टार पॉवरची भर घालत, ISRL चे अधिकृत ब्रँड अॅम्बेसेडर मेगास्टार सलमान खान हैदराबाद आणि कालिकतमधील राऊंडमध्ये उपस्थित राहणार आहेत — चाहत्यांसोबत संवाद साधत आणि भारतातील वाढत्या मोटरस्पोर्ट संस्कृतीचा उत्सव साजरा करत.

 

चाहत्यांसाठी तिकिटं BookMyShow वर उपलब्ध असून, जनरल सीटिंगपासून VIP पास पर्यंत विविध पर्याय ॲप आणि वेबसाइटवर बुक करता येतील.

 

जागतिक प्रेक्षकांसाठी, हैदराबाद राऊंडचे प्रसारण युरोस्पोर्टवर भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीवमध्ये केले जाईल, तर कॅनडामध्ये हा राऊंड RevTV वर पाहता येईल. तसेच, हा कार्यक्रम भारतात FanCode वर आणि जगभरात ISRL च्या YouTube चॅनेलवर लाइव्ह स्ट्रीम के

ला जाईल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments