Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedपेशवेकालीन श्री लक्ष्मीनारायण मंदिरात रांगोळी व दीपोत्सव त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री शंकर महाराजांची...

पेशवेकालीन श्री लक्ष्मीनारायण मंदिरात रांगोळी व दीपोत्सव त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री शंकर महाराजांची रांगोळी

पुणे : रविवार पेठेतील श्री लक्ष्मीनारायण मंदिर (क्रमांक ६६९) हे पेशवेकालीन कालखंडातील प्राचीन मंदिर असून हंड्या आणि झुंबरांनी सुसज्ज असे हे मंदिर भाविकांचे आकर्षण ठरले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

कलाकार संजय मोडक आणि गौरी गुमास्ते यांनी सद्गुरू श्री शंकर महाराज यांचे स्वरूप आठ बाय चार फूट आकाराच्या रांगोळीत हुबेहूब साकारले असून, ही रांगोळी भाविकांसाठी तीन दिवस पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहे. मंदिरातील पुरातन कारंजे देखील यानिमित्त सुरू ठेवण्यात आले आहे.

 

पहाटे श्री लक्ष्मीनारायणास महा-अभिषेक करून नविन पोशाख परिधान करण्यात येतो. देवतांची फुलांनी सुंदर आरास केली जाते. सायंकाळी दीपोत्सव साजरा करून त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो.

 

या मंदिरात श्री गोकुळाष्टमी, श्रीराम नवमी आणि त्रिपुरी पौर्णिमा हे वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतात. मंदिराचे व्यवस्थापन गेल्या अनेक पिढ्यांपासून येथील वहिवाटदार पुजारी देवेश गुमास्ते आणि गौरी राहुल गुमास्ते हे निष्ठेने व सातत्याने करत

आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments