पुणे, दि. ७ नोव्हेंबर, २०२५ : उत्तराखंड मधील देहरादूर येथे राष्ट्रीय बँडी असोसिएशनच्या वतीने उद्या (८ नोव्हेंबर) पासून आयोजित करण्यात येत असलेल्या ७ व्या राष्ट्रीय बँडी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ दाखल झाला असून महाराष्ट्र बँडी समितीच्या वतीने निवड करण्यात आलेल्या तब्बल ४० खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे.
१०, १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुले व मुली असे एकूण ५ संघ महाराष्ट्राच्या वतीने या राष्ट्रीय स्पर्धेत उतरले असून मागील वर्षीप्रमाणे महाराष्ट्राच्या संघाला यावर्षीही पदकाची अपेक्षा असल्याचे पुणे जिल्हा बँडी असोसिएशनचे अध्यक्ष व पुणे जिल्ह्याच्या आईस हॉकी असोसिएशनचे सचिव अजय जगताप यांनी सांगितले.
बॅंडी, आइस हॉकीसारखाच एक खेळ असून रशियाचा खेळ म्हणून तो प्रसिद्ध आहे. हा खेळ संपूर्ण युरोप सोबतच स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये, बाल्टिक देशांमध्ये व मंगोलिया मध्ये खेळला जातो. मागील काही वर्षांपासून हा खेळ भारतात प्रचलित होत असून राष्ट्रीय स्तरावर या खेळाची ही ७ वी राष्ट्रीय स्पर्धा आहे. मागील २ वर्षांपासून महाराष्ट्राचा संघ या स्पर्धेत सहभागी होत असून महाराष्ट्राच्या संघात पुण्याच्या खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आईस स्केटिंग मध्ये रुची असलेले अनेकजण सध्या या खेळाकडे वळत असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळणारे यश, कमी स्पर्धा आणि या खेळाला मिळत असलेले पाठबळ आदी गोष्टींमुळे खेळाडू या खेळाकडे आकर्षित होत असल्याचे अजय जगताप म्हणाले.
उद्यापासून सुरु होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी मागील महिन्यात पंढरपूर येथे राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली असून जिल्हा स्तरावर पात्र ठरलेल्या खेळाडूंना राज्य स्तरावर चांगली कामगिरी करीत राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश पुढील महिन्यात रशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल.
राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या महाराष्ट्राच्या संघात राज्याच्या पंढरपूर, रायगड, कोल्हापूर, मुंबई, पुणे या भागातील खेळाडूंचा प्रामुख्याने समावेश आहे. तर राष्ट्रीय स्पर्धेसाठी ८ ते ९ राज्यांमधून ४० हून अधिक संघ देहारादूर येथे दाखल झाले आहेत हे विशेष. या संघांमध्ये महाराष्ट्रासोबतच उत्तराखंड, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजराथ, हरियाणा, दिल्ली या राज्यांतील संघांचा समावेश आहे.
महाराष्ट्राच्या संघाच्या पुण्यातील खेळाडूंना डॉ. कलमडी श्यामराव जुनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका शोभा चन्नाल यांनी सरावासाठी कॉलेज उपलब्ध करून दिले होते, ज्याचा उपयोग खेळाडूं
ना झाला.


