पुणे/मुंबई, ६ नोव्हेंबर २०२५: भारतातील वेगाने वाढणाऱ्या आर्थिक प्रगतीचा लाभ घेण्यासाठी बजाज फिन्सर्व्ह ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेडने आपल्या बँकिंग आणि वित्तीय सेवा फंडच्या प्रारंभाची घोषणा केली आहे. हा एक ओपन-एंडेड इक्विटी फंड असून, तो बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. नवीन फंड ऑफर (NFO) सदस्यत्व घेण्यासाठी १० नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू होईल आणि २४ नोव्हेंबर २०२५ रोजी बंद होईल. या फंडाचे बेंचमार्क NIFTY Financial Services TRI असेल.
भारताचे बँकिंग आणि वित्तीय सेवा (BFSI) क्षेत्र अभूतपूर्व वेगाने बदलत आहे. पारंपरिक बँकिंगच्या चौकटीपलीकडे जाऊन हे क्षेत्र आता एनबीएफसी, विमा कंपन्या, ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या (AMC), कॅपिटल मार्केट्स आणि आधुनिक फिनटेक कंपन्यांचा समावेश करत आहे. गेल्या दोन दशकांमध्ये या क्षेत्राचे बाजारभांडवल सुमारे 50# पटीने वाढले आहे, ज्यामागे वेगवान डिजिटायझेशन, वाढती कर्ज प्रवेशता, वित्तीय समावेशन आणि ठोस नियामक सुधारणा ही प्रमुख कारणे आहेत. आज हे क्षेत्र भारताच्या आर्थिक गतीचे केंद्रबिंदू बनले आहे, जे गुंतवणूकदारांना देशाच्या वित्तीय परिवर्तनात सहभागी होण्याची आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीच्या प्रवासाचा भाग होण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देते.
बजाज फिन्सर्व्ह म्युच्युअल फंडाच्या मेगाट्रेंड्स धोरणावर आधारित, हा फंड बँका, एनबीएफसी, विमा कंपन्या, एएमसी आणि इतर भांडवली बाजार सहभागीदारांना समाविष्ट असलेल्या विविध पोर्टफोलिओच्या माध्यमातून भारताच्या विकसित होत असलेल्या वित्तीय परिसंस्थेतील संधींचा फायदा घेण्याचे उद्दिष्ट ठेवतो. हा फंड दीर्घकालीन संरचनात्मक ट्रेंड्ससह संरेखित असलेल्या १८० ते २०० शेअर्सच्या मेगाट्रेंड्स युनिव्हर्समधून निवडलेल्या ४५ ते ६०* शेअर्समध्ये गुंतवणूक करेल.
यूपीआयचा प्रसार, डिजिटल कर्ज, जन धन योजना आणि एनबीएफसी, म्युच्युअल फंड्स आणिविमा क्षेत्रातील वाढती भागीदारी, अशा मेगाट्रेंड्सच्या आधारावर तयार केलेली ही योजना, दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी आहे, विशेषतः ते गुंतवणूकदार जे उच्च जोखीम घेण्यास तयार असून बीएफएसआय(BFSI) क्षेत्रातील लक्ष केंद्रीत गुंतवणुकीद्वारे संपत्ती निर्माण करू इच्छितात.
गणेश मोहन, व्यवस्थापकीय संचालक (Managing Director), बजाज फिन्सर्व्ह ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेड सांगतात, “भारत विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत असताना आणि जागतिक स्तरावर टॉप ३ अर्थव्यवस्थान पेकी एक बनत असताना, वित्तीय सेवा क्षेत्र या वाढीला सक्षम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. भारतातील वाढती समृद्धी आणि आकांक्षा या कर्ज, विमा, गुंतवणूक, पेमेंट्स आणि कॅपिटल मार्केट उत्पादनांसारख्या विविध वित्तीय सेवांमध्ये मोठी वाढ घडवतील. भारताची अर्थव्यवस्था विस्तारत असताना बीएफएसआय क्षेत्र देशाच्या वाढीच्या केंद्रस्थानी असेल आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय भांडवल आकर्षित करेल. आमच्या मते, हा प्रवाह गुंतवणूकदारांसाठी एक अशी अप्रतिम संधी निर्माण करून देतो, ज्याद्वारे ते या ‘मेगाट्रेंड’ मध्ये सहभागी होऊ शकतात, विशेषत: एका अशा थीमॅटिक फंडद्वारे जो संपूर्ण वित्तीय सेवा क्षेत्रातील संधी ओळखून भविष्यातील वाढीचा लाभ घेण्यावर लक्ष केंद्रित करेल.
निमेश चंदन, सीआयओ, बजाज फिन्सर्व्ह ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेड यांचे मत, “ बजाज फिन्सर्व्ह बँकिंग आणि वित्तीय सेवा फंडसाठी आमच्या गुंतवणुकीच्या दृष्टिकोन काटेकोर संशोधन आणि शिस्तबद्ध समभाग निवडीवर आधारित आहे. हा फंड बँकिंग, एनबीएफसी, विमा, कॅपिटल मार्केट इंटरमीडियरी आणि ॲसेट मॅनेजमेंट या विविध क्षेत्रांतील सुमारे १८० ते २०० मेगाट्रेंड्सवर आधारित कंपन्यांमधून निवडलेल्या ४५ ते ६० समभागांमध्ये गुंतवणूक करेल, ज्यामुळे गुंतवणुकीचा विस्तार आणि सखोलता दोन्ही साध्य होतील. या क्षेत्रात वाढीच्या अनेक संधी असल्या तरी आम्हाला विश्वास आहे की टिकाऊ स्पर्धात्मक लाभ, सुयोग्य भांडवल व्यवस्थापन आणि मजबूत गव्हर्नन्स असलेल्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक केल्यास दीर्घकालीन चांगले परिणाम मिळतात. गुणवत्ता आणि दीर्घकालीन दृष्टीकोनावर लक्ष केंद्रित करून आम्ही गुंतवणूकदारांना भारताच्या विकसित होत असलेल्या BFSI क्षेत्रातील सर्वोत्तम संधींचा लाभ देत, सातत्यपूर्ण आणि जोखीम-संतुलित परतावा देण्याचा प्रयत्न करणार आहोत.”
फंडाचा इक्विटी भाग श्री. निमेश चंदन (CIO) आणि श्री. सौरभ गुप्ता यांच्यामार्फत व्यवस्थापित केला जातो, तर कर्ज गुंतवणूक श्री. सिद्धार्थ चौधरी यांच्यामार्फत व्यवस्थापित केली जाते. किमान अर्ज रक्कम ₹५०० (तसेच ₹१ च्या पटीत वाढवता येणारी) असून, किमान अतिरिक्त अर्ज ₹१०० (तसेच ₹१ च्या पटीत) असू शकतो. जर गुंतवणूक अलॉटमेंटच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत रिडीम केली, तर १% एग्झिट लोड लागू होईल. हा फंड ग्रोथ (Growth) आणि आयडीपीडब्ल्यू (IDCW – Income Distribution cum Capital Withdrawal) असे दोन्ही पर्याय प्र
दान करतो.


