▪️बंगळुरू, कर्नाटक –
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला विजयादशमी (2 ऑक्टोबर 2025) रोजी 100 वर्षे पूर्ण झाले असून संघाने राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी पुढे पाऊल टाकले आहे. या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात विजयादशमी उत्सव, युवा संमेलन, गृह संपर्क, हिंदू संमेलने, सामाजिक सद्भाव समावेश व प्रतिष्ठित व्यक्तींशी संवाद असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
संघाने या 100व्या वर्षातही समाजातील प्रतिष्ठित नागरिक, धोरणनिर्माते आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद चालूच ठेवला आहे. येत्या रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे येत्या 8 व 9 नोव्हेंबर 2025 रोजी बंगळुरू येथे आयोजित विशेष व्याख्यानमालेत मार्गदर्शन करणार आहेत.
या मालिकेतील दुसरे व्याख्यान शनिवार व रविवार, 8 व 9 नोव्हेंबर 2025 रोजी पीईएस विद्यापीठ, होसकेरेहळ्ळी रिंग रोड, बाणशंकरी, बंगळुरू येथे होणार आहे. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठीच खुला असून त्यासाठी विविध क्षेत्रांतील सुमारे 1,200 प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे. या व्यक्तींमध्ये मुख्यतः कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ राज्यांतील शिक्षण, साहित्य, कला, विज्ञान, प्रशासन, पत्रकारिता, क्रीडा, उद्योग, सामाजिक सेवा आणि अध्यात्म क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे.
या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प “संघाचा 100 वर्षांचा प्रवास: नवीन क्षितिजे” या शीर्षकाखाली 26–28 ऑगस्ट 2025 रोजी नवी दिल्लीत यशस्वीरीत्या पार पडले.
शनिवार, 8 नोव्हेंबर रोजी सायं 4:00 ते 7:30 पर्यंत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत दोन सत्रांमध्ये व्याख्यान देतील. रविवार, 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30 ते 1:30 डॉ. मोहन भागवत निमंत्रितांच्या प्रश्नांना उत्तरे देतील.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण रा. स्व. संघाच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करण्यात येणार आहे.
– YouTube: www.youtube.com/RSSorg
– Facebook: www.facebook.com/RSSorg


