Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedअतिप्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी उत्सव सोमवारपासून (दि.१०)* श्री...

अतिप्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी उत्सव सोमवारपासून (दि.१०)* श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे आयोजन

 

 

पुणे : कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूवीर्ची पुण्यातील वस्ती. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. अशा कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी उत्सव दिनांक १० ते १२ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.

 

श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे श्री काळभैरवनाथ जयंती (जन्माष्टमी) निमित्त उत्सव होणार आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी (दि.१०) सकाळपासून आरती, श्री भैरव अष्टोत्तरशतनामावली त्यानंतर सायंकाळी ५ वाजता सुदर्शन होम व आरती होणार आहे.

 

दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी आरती, गण होम दुपारी श्री भैरव अष्टोत्तरशतनामावली त्यानंतर सायंकाळी ५ वाजता दुर्गा पूजा व आरती होईल. तर, बुधवारी (दि.१२) सकाळी ६.३० वाजता लघुरुद्र होणार आहे. दुपारी १२ वाजता श्री भैरव अष्टोत्तरी शत नामावली, आरती, रात्री ९ वाजता रुद्र अभिषेक आणि रात्री १२ वाजता मुख्य जन्मसोहळा महाआरती होईल.

 

श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत आहे. भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराचे व्यवस्थापन लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात. भाविकांनी उत्सवात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments