पुणे दिनांक –10 नोव्हेंबर 2025 — आर्टिफिशल इंटेलिजन्ट व डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर वाढल्यामुळे त्याचा परिणाम बँकामधील नोकरभर्तीवर झाल्याचा दावा बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन, मुंबईचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड दिनेश झा लल्लन यांनी केला.
बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन पुणे विभागाचे त्रैवार्षीक अधिवेशन एस पी कॉलेजच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाचे उदघाटन कॉम्रेड दिनेश झा लल्लन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या अधिवेशनास एफ. जी. एम. ओ. पुणे ऑफिसचे श्री. प्रमोदकुमार द्विवेदी, पुणे विभागाचे झोनल मॅनेजर संजय कदम, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी कॉम्रेड शिरीष राणे, कॉम्रेड विनोद कदम, कॉम्रेड दिलीप ठोंबरे, कॉम्रेड निलेश वरपे आदी उपस्थित होते. या अधिवेशना 13 जिल्ह्यातील बँक कर्मचारी उपस्थित होते. मराठवाडा मधील आपदग्रस्त भागातील विध्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून 1 लाख रुपयांचा धनादेश महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनकडे सुपूर्द करण्यात आला. हार्दिक धनादेश फेडरेशनतर्फे आरोग्य सेना या संस्थेस देण्यात आला. संस्थेतर्फे तो धनादेश प्रा शरद जावडेकर यांनी स्वीकारला. या रक्कमतून विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
कॉम्रेड लल्लन आपल्या भाषणात म्हणाले की, बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बँकाची प्रगती करावी ग्राहकांना उत्तम सेवा दयावी.
आर्टिफिशल इंटेलिजन्ट व डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर वाढल्यामुळे बँकेत नवीन नोकरभर्तीवर बंधने आली आहेत त्यामुळे बँकेत मनुष्यबल कमी पडत आहेत.
केंद्र सरकारने नवीन नोकरभरती करवी या मागणीसाठी लवकरच आंदोलन करावे लागेल. असेही ते म्हणाले.
श्री. प्रमोद कुमार द्विवेदी, फील्ड चिफ जनरल मॅनेजर, एफ. जी. एम ओ. पुणे, कॉ. संजय कदम, झोनल मॅनेजर, पुणे झोन यांची यावेळी भाषणे झाली. कॉ. शिरीष राणे, जनरल सेक्रेटरी यांनी प्रास्ताविक केले. कॉ. विनोद कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले कॉ. श्रुती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ओळ -= मराठवाडा मधील आपदग्रस्त भागातील विदर्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनतर्फे 1 लाख रुपयांचा धनादेश आरोग्य सेना संस्थेतर्फे प्रा शरद जावडेकर यांनी स्वीकारला.


