• भारतातील वैज्ञानिक संशोधनातील असाधारण योगदानासाठी सहा श्रेणींमध्ये अद्वितीय विद्वानांचा सन्मान
• इन्फोसिस प्राइज २०२५ च्या सहा विजेत्यांमध्ये प्राकृत आणि कन्नड काव्यशास्त्राचे अभ्यासक
• इन्फोसिस प्राइज २०२५ च्या सहा विजेत्यांमध्ये बंगळुरूच्या शास्त्रज्ञांचा समावेश
• संशोधनासंबंधी इन्फोसिस प्राइज २०२५ वेगवान अल्गोरिदम, आरोग्य अर्थशास्त्र, इलेक्ट्रोकेमिकल खत उत्पादन, प्राकृत काव्यशास्त्र या विषयांमधील संशोधकांना जाहीर
बंगळुरू, भारत – १२ नोव्हेंबर २०२५: इन्फोसिस सायन्स फाउंडेशनने (आयएसएफ) आज अर्थशास्त्र, अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान, मानव्यविद्या आणि सामाजिक विज्ञान, जीवन विज्ञान, गणितीय विज्ञान व भौतिक विज्ञान या सहा श्रेणींमध्ये इन्फोसिस प्राइज २०२५ च्या विजेत्यांची घोषणा केली. इन्फोसिस पुरस्काराने २००९ मध्ये स्थापन झाल्यापासून अशा व्यक्तींच्या उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान केला आहे ज्यांचे संशोधन आणि त्यांच्या शिष्यवृत्ती भारतावर लक्षणीय परिणाम करतात. प्रत्येक श्रेणीतील पुरस्कारात सुवर्णपदक, प्रशस्तिपत्र आणि १००,००० अमेरिकन डॉलर्स (किंवा भारतीय रुपयामध्ये त्याच्या समतुल्य) बक्षीस रक्कम समाविष्ट आहे.
इन्फोसिस प्राइज २०२५ च्या विजेत्यांची निवड प्रसिद्ध विद्वान आणि तज्ञांच्या आंतरराष्ट्रीय ज्युरी पॅनेलने केली होती. आपल्या स्थापनेपासून आयएसएफने मानवी जीवनाच्या विविध पैलूंवर प्रभाव पाडणाऱ्या अभूतपूर्व संशोधन आणि शिष्यवृत्तींना मान्यता दिली आहे. या पुरस्काराने २०२४ पासून वयाच्या ४० वर्षांखालील संशोधकांना सन्मानित करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे, अपवादात्मक प्रतिभेची लवकर ओळख प्रस्थापित करण्याच्या गरजेवर भर दिला आहे. कारकीर्दीच्या सुरूवातीच्या टप्प्यात असलेल्या संशोधकांचे हे प्रोत्साहन पुढील पिढीतील विद्वान आणि नवसंशोधकांसाठी प्रेरणादायी ठरेल.
इन्फोसिस प्राइज २०२५ च्या विजेत्यांची घोषणा आयएसएफचे विश्वस्त श्री. के. दिनेश (अध्यक्ष, विश्वस्त मंडळ), श्री. नारायण मूर्ती, श्री. श्रीनाथ बटनी, श्री. क्रिस गोपालकृष्णन, डॉ. प्रतिमा मूर्ती आणि श्री. एस. डी. शिबुलाल यांनी केली. आयएसएफचे इतर विश्वस्त श्री. मोहनदास पै, श्री. नंदन नीलेकणी आणि श्री. सलील पारेख यांनी या वर्षीच्या विजेत्यांचे अभिनंदन केले.
इन्फोसिस प्राइज हा भारतातील विज्ञान आणि संशोधनातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव करणारा सर्वात मोठा पुरस्कार आहे. याशिवाय इन्फोसिस प्राइज विजेत्यांना अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यात नोबेल पारितोषिक (अभिजित बॅनर्जी आणि एस्थर डुफ्लो), फील्ड्स पदक (मंजुल भार्गव आणि अक्षय वेंकटेश), डॅन डेव्हिड पुरस्कार (संजय सुब्रह्मण्यम), मॅकआर्थर ‘जीनियस’ ग्रँट आणि ब्रिटिश अकादमी बुक पुरस्कार (सुनील अमृत), मूलभूत भौतिकशास्त्रातील ब्रेकथ्रू पुरस्कार (अशोक सेन) आणि मार्कोनी पुरस्कार (हरी बालकृष्णन) यांचा समावेश आहे. अनेक विजेत्यांना रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवडण्यात आले आहे. त्यात गगनदीप कांग यांचा समावेश असून त्या रॉयल सोसायटीच्या फेलो म्हणून निवडल्या जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
इन्फोसिस सायन्स फाउंडेशनच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष के. दिनेश म्हणाले, “इन्फोसिस प्राइज २०२५ च्या विजेत्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या कार्यातून संशोधन, विज्ञान आणि समाज यांच्यातील महत्त्वाचा संबंध दिसून येतो आणि नवसंशोधकांच्या पुढच्या पिढीला प्रेरणा मिळते. संशोधन आणि विज्ञान हे मानवी प्रगतीचे केंद्र असल्याच्या आमच्या विश्वासाचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे इन्फोसिस प्राइज आहे. नवसंशोधनास चालना देणाऱ्या आणि विविध विषयांमधील समज वाढवणाऱ्या संस्कृतीचे संगोपन करण्यासाठी फाउंडेशनच्या चिरस्थायी वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.”
सहा श्रेणींमध्ये इन्फोसिस पुरस्कार २०२५ चे विजेते खालीलप्रमाणे:
अर्थशास्त्र
मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील अर्थशास्त्राचे प्राध्यापक निखिल अग्रवाल यांना अर्थशास्त्रातील इन्फोसिस प्राइज २०२५ जाहीर करण्यात आले आहे. शालेय निवड, वैद्यकीय निवास आणि मूत्रपिंडदान अशा गोष्टींच्या अनुभवजन्य अभ्यासासाठी पथदर्शी पद्धतीचा विकास आणि अंमलबजावणी तसेच बाजारपेठ डिझाइनमध्ये त्यांच्या अग्रगण्य योगदानाबद्दल अर्थशास्त्राचा बराचसा भाग असे गृहीत धरतो की बाजारात मागणी तसा पुरवठा होतो. सामान्य गोष्टींबाबत हे खरे असले तरी मूत्रपिंडांची गरज असलेल्यांना मूत्रपिंड पुरवण्यास इच्छुक असलेले लोक मिळत नाहीत किंवा महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना बवे असलेले महाविद्यालय मिळत नाही. या समस्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत परंतु त्यावर काम केले जात नाही. अग्रवाल यांच्या कार्याने या प्राथमिक साहित्याचे संकलन करून एक डेटा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे धोरणाची रचना नव्याने करणे शक्य होते.
अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान
टोरंटो विद्यापीठातील गणितीय आणि संगणकीय विज्ञानाचे सहयोगी प्राध्यापक (सीएससी) सुशांत सचदेवा यांना अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञानातील २०२५ चे इन्फोसिस प्राइज जाहीर करण्यात आले आहे. सुशांत सचदेवा यांना गणितीय ऑप्टिमायझेशन आणि अल्गोरिथमिक सिद्धांतातील दीर्घकालीन खुल्या प्रश्नांचे निराकरण या विषयातील सखोल अभ्यासासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. या संशोधनामुळे इंटरनेट, वाहतूक आणि संप्रेषण नेटवर्कसह सामाजिक जीवनरेषांमध्ये माहिती प्रवाहावर परिणाम करणाऱ्या संगणकीय समस्यांमध्ये साध्य करण्यायोग्य कामगिरीवर नवीन मानके स्थापित झाली आहेत. ते सैद्धांतिक संगणक विज्ञानातील एक अग्रणी असून त्यांच्या मूलभूत योगदानाने आधुनिक समाजात अंतर्भूत असलेल्या अनेक अल्गोरिदमिक आव्हानांवर खोलवर परिणाम केला आहे.
मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रे
मान्यविद्या आणि सामाजिक शास्त्रे या विषयातील इन्फोसिस प्राइज २०२५ शिकागो विद्यापीठातील दक्षिण आशियाई भाषा आणि संस्कृती विभागातील सहयोगी प्राध्यापक अँड्र्यू ऑलेट यांना जाहीर करण्यात आला आहे. ते या पिढीतील प्राकृत भाषांचे जगातील आघाडीचे अभ्यासक आहेत. त्यांचे लँग्वेज ऑफ द स्नेक्स हे पुस्तक मागील दोन हजार वर्षांमध्ये संस्कृत आणि भारतीय स्थानिक भाषेच्या अनुषंगाने प्राकृतच्या सांस्कृतिक भूमिकेचे सखोल विश्लेषण आहे. अँड्र्यू ऑलेट यांचे भाषिक प्रभुत्व आणि ज्ञान चित्तथरारक आहे. त्यात संस्कृत, प्राकृत, कन्नड, तमिळ, जुने जावानीज आणि चिनी भाषेच्या अभ्यासातील तपशीलवार योगदानापासून ते आधुनिक युरोपीय भाषांचे ज्ञान आणि ग्रीक आणि लॅटिनमधील त्यांचा अभ्यास यांचा समावेश आहे. संस्कृत साहित्य आणि इतर भारतीय भाषांमध्ये ओलेटसारख्या शिष्यवृत्तीमुळे आग्नेय आशियातील कानाकोपऱ्यात भारतीय संस्कृतीची उल्लेखनीय वैश्विक पोहोच समजण्यास मदत होते.
जीव विज्ञान
जीव विज्ञानातील इन्फोसिस प्राइज २०२५ बंगळुरू येथील राष्ट्रीय जैविक विज्ञान केंद्रातील सहयोगी प्राध्यापक अंजना बद्रीनारायणन यांना जीनोम देखभाल आणि दुरुस्तीच्या यंत्रणा समजून घेण्यातील त्यांच्या अग्रगण्य योगदानाबद्दल जाहीर करण्यात आला आहे. अनुवांशिक आणि पेशींच्या जैविक दृष्टिकोनांसह नाविन्यपूर्ण लाइव्ह-सेल इमेजिंगद्वारे डीएनएतील दोष कसे दुरुस्त केले जातात याची मूलभूत तत्त्वे स्पष्ट केली आहेत, अविभाजित पेशींमध्ये परिवर्तन दर्शवले केले आहे आणि माइटोकॉन्ड्रियल डीएनए नुकसान प्रतिसादांचे नवीन मार्ग शोधून जीव आणि उत्क्रांतीसाठी केंद्रस्थानी असलेल्या तत्त्वांना प्रकाशात आणले आहे. पेशी त्यांच्या जीनोमचे रक्षण करण्यासाठी वापरत असलेल्या सार्वत्रिक घटकांचा शोध लावून त्यांनी जीनोम आणि सूक्ष्मजीव जीवशास्त्राच्या क्षेत्रात खोलवर प्रगती केली आहे व जीनोम स्थैर्य आणि पेशीय लवचिकतेमध्ये संशोधनासाठी नवीन दिशानिर्देश स्थापित केले आहेत.
गणितीय विज्ञान
गणितीय विज्ञानातील इन्फोसिस पुरस्कार २०२५ मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च येथील गणित शाळेतील सहयोगी प्राध्यापक सब्यसाची मुखर्जी यांना त्यांच्या अदिवतीय आणि मूलभूत कार्यासाठी जाहीर करण्यात आला आहे. त्यांचे कार्य गणिताच्या दोन भिन्न क्षेत्रांना जोडते – क्लेनियन गट कृतींची गतिशीलता आणि जटिल गतिशीलतेमध्ये होलोमॉर्फिक आणि अँटी-होलोमॉर्फिक नकाशांची पुनरावृत्ती. त्याच्या निकालांनी कॉन्फॉर्मल डायनॅमिक्सबद्दलच्या आपल्या समजुतीला आकार दिला आहे, अभ्यासाचे हे क्षेत्र भौतिकशास्त्र, द्रव गतिमानता आणि अगदी डेटा सायन्समध्येही महत्त्वाचे परिणाम देते.
भौतिक विज्ञान
कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील (कॅलटेक) केमिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक कार्तिश मंथिराम यांना भौतिक विज्ञानातील २०२५ चा इन्फोसिस पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांना आवश्यक रसायनांबाबत शाश्वत इलेक्ट्रोकेमिकल कार्यासाठी त्यांच्या अग्रगण्य कार्याबद्दल गौरविण्यात आले आहे. लिथियम-मेडिएटेड अमोनिया संश्लेषण आणि ऑक्सिजन-अणू हस्तांतरण उत्प्रेरकातील त्यांच्या यशामुळे विद्युतीकृत रासायनिक उत्पादनाबद्दलची आपल्या ज्ञानात भर पडली आहे. त्यांनी हे दाखवून दिले आहे की अक्षय वीज शेती आणि उद्योगासाठी मूलभूत असलेल्या रसायनांचे निवडक, कार्यक्षम संश्लेषण उपयुक्त ठरू शकते.


