गुरूग्राम, भारत – 12 November, २०२५: सॅमसंग या भारतातील आघाडीच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज आपल्या सॅमसंग केअर+ सर्विसच्या विस्तारीकरणाची घोषणा केली, जेथे रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, एअर कंडिशनर्स, मायक्रोवेव्ह ओव्हन्स आणि स्मार्ट टीव्ही अशा घरगुती उपकरणांसाठी विस्तारित वॉरंटी प्लॅन्स सादर केले आहेत. देशभरात घराघरांमध्ये उत्सवी उत्साहाचे वातावरण असताना सॅमसंगचा ग्राहकांना अधिक सुरक्षितता व सोयीसुविधेच्या माध्यमातून अधिक मन:शांती देत यंदा सणासुदीचा काळ अधिक उत्साहित आणि लाभदायी करण्याचा मनसुबा आहे. ग्राहक १ ते ४ वर्षांपर्यंतच्या प्लॅन्समधून निवड करू शकतात, जेथे त्यांना प्रतिदिन २ रूपयांपासून सुरू होणारे सर्वसमावेशक संरक्षण आणि सोयीसुविधा मिळेल.
अपग्रेडेड सॅमसंग केअर+ सर्विसमध्ये सॉफ्टवेअर अपडेट्स आणि स्क्रिनमधील नुकसानासाठी (प्रत्यक्ष नुकसान नाही) उद्योगामधील प्रथम कव्हरेजचा देखील समावेश आहे. यामधून ग्राहकांना हार्डवेअरसंदर्भात समस्यांचे, तसेच सॉफ्टवेअर कार्यक्षमता आणि डिस्प्लेसंदर्भात समस्यांचे देखील निराकरण होण्याची खात्री मिळते, ज्यामुळे सॅमसंग केअर+ उद्योगामधील सर्वात सर्वसमावेशक उपकरण संरक्षण उपक्रम आहे.
”आम्ही ग्राहक अनुभव अधिक उत्साहित करण्याप्रती, सॉफ्टवेअर अपडेट्स आणि स्क्रिनमधील नुकसानासाठी कव्हरेज अशा अद्वितीय फायद्यांच्या माध्यमातून घरगुती उपकरणांचा मालकीक्क वाढवण्याप्रती, तसेच सर्व चॅनेल्समध्ये सॅमसंग केअर+ विस्तारित वॉरंटी प्लॅन्सची उपलब्धता वाढवण्याप्रती कटिबद्ध आहोत,” असे सॅमसंग इंडियाच्या डिजिटल अप्लायन्सेसचे उपाध्यक्ष गुफरान आलम म्हणाले.
कौशल्य, पोहोच, विश्वसनीयता, गती, स्मार्ट सेवा, संरक्षण आणि शाश्वततता या आधारस्तंभांवर डिझाइन करण्यात आलेले सॅमसंग केअर+ ग्राहकांना १३,००० हून अधिक सॅमसंग-प्रमाणित इंजीनिअर्स, २,५०० हून अधिक सर्विस सेंटर्स आणि १०० टक्के अस्सल सॅमसंग पार्टस् देते, ज्यामधून वेळेवर आणि उच्च दर्जाच्या सर्विसची खात्री मिळते. ग्राहकांना नऊ भाषांमध्ये बहुभाषिक साह्य मिळेल, तसेच सॅमसंग अॅप ग्राहकांना सर्विसेसवर देखरेख ठेवण्याची आणि नियोजित देखभालीसाठी वेळेवर रिमाइंडर्स मिळण्याची सुविधा देते.
***


