जागतिक स्तरावर अत्याधुनिक डेटा सेंटर व्यावसायिक आणि व्यवसाय भागीदारांना तयार करणे हा नवीन प्रशिक्षण केंद्राचा उद्देश
भारत, पुणे [13 नोव्हेंबर 2025] – अत्यावश्यक डिजिटल पायाभूत सुविधा क्षेत्रात कार्यरत जागतिक अग्रणी कंपनी व्हर्टिव (NYSE: VRT) ने आज पुणे, भारत येथील आपल्या इंटिग्रेटेड बिझनेस सर्व्हिसेस (IBS) केंद्रामध्ये नवीन व्हर्टिव ट्रेनिंग अकॅडमी आणि टेक्नॉलॉजी एक्सलन्स सेंटर सुरू करण्याची घोषणा केली. या उद्घाटनाद्वारे विशेषतः जागतिक डेटा सेंटर आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रांमध्ये कंपनीने प्रतिभा विकास, कार्यक्षमतेतील उत्कृष्टता आणि तंत्रज्ञान सक्षमीकरण यांप्रतीची आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली आहे.
ही अकॅडमी कोलोकेशन/क्लाउड, एंटरप्राइझ, कम्युनिकेशन नेटवर्क्स, तसेच व्यावसायिक आणि औद्योगिक डेटा सेंटर क्षेत्रे अशा विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांसाठी प्रत्यक्ष अनुभवावर आधारित सखोल शिक्षण देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. या केंद्रातील कार्यक्रम व्हर्टिव सेवा अभियंते, तांत्रिक विक्री तज्ज्ञ, व्यवसाय भागीदार आणि वेगाने बदलणाऱ्या डिजिटल परिक्षेत्रातील व्यावहारिक अनुभव व माहिती मिळवू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांसाठी आहेत. अकॅडमीचे वैशिष्ट्यपूर्ण ओपन-फॉरमॅट वातावरण प्रगत कूलिंग डिस्ट्रीब्यूशन युनिट्स (CDUs), पॉवर स्विचगियर सिस्टम्स, थ्री-फेज अनइंटरप्टिबल पॉवर सप्लाय (UPS) मॉड्युल्स आणि थर्मल मॅनेजमेंट सोल्यूशन्स यांचे लाइव्ह डेमो एकत्र करते. त्यायोगे आधुनिक डेटा सेंटर्समधील वास्तविक कामकाजाच्या परिस्थितीचे वातावरण तयार केले जाते.
शैक्षणिक उद्देशांव्यतिरिक्त टेक्नॉलॉजी एक्सलन्स सेंटर मध्ये प्रगत अभियांत्रिकी आणि संशोधन आणि विकास प्रयोगशाळा आहेत. त्यांचा उद्देश ऊर्जा आणि औष्णिक व्यवस्थापन उपाय सुविधा यांमध्ये नावीन्य आणणे आहे. जागतिक स्तरावर डेटा सेंटर्स आणि दूरसंचार उपयोजनांमध्ये ऊर्जा कार्यक्षमता, विश्वसनीयता आणि पर्यावरणीय जबाबदारी वाढवण्यासाठी या प्रयोगशाळा व्हर्टिवच्या अत्यावश्यक डिजिटल पायाभूत सुविधा उपाययोजनांच्या संपूर्ण चाचणी, प्रमाणीकरण आणि ऑप्टिमायझेशनसाठी सक्षम आहेत.
“पुणे हे व्हर्टिवसाठी एक धोरणात्मक जागतिक डिलिव्हरी हब बनले आहे आणि आम्ही वेगाने विस्तार करण्याची योजना आखली आहे,” असे व्हर्टिव इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुभासिस मजुमदार यांनी सांगितले. “डेटा सेंटर क्षेत्रातील AI गुंतवणुकीतील वाढ लक्षात घेता कौशल्यसंपन्न, अनुकूल आणि अद्ययावत कार्यशक्तीची मोठी मागणी असेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आज आपण सुरू करत असलेली ही ट्रेनिंग अकॅडमी नवीन तसेच विद्यमान डेटा सेंटर्सचे डिझाइन आणि सेवा देण्यासाठी अभियंते आणि ग्राहकांना प्रशिक्षण आणि कौशल्यवृद्धी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.”
“भारत हा व्हर्टिवच्या जागतिक सेवा परिसंस्थेचा अविभाज्य भाग असून त्यामुळे आम्हाला जगभरातील ग्राहकांना सातत्यपूर्ण उत्कृष्टता आणि गतिशीलता पुरविता येते,” असे व्हर्टिवच्या ग्लोबल सर्व्हिसेस बिझनेस युनिटचे उपाध्यक्ष रायन जार्विस म्हणाले. “या उद्घाटनामुळे आमच्या क्षमतांचा विस्तार करण्याची आणि सर्वोत्तम पद्धती सर्व प्रदेशांमध्ये लागू करण्याची आमची क्षमता अधिक मजबूत होते. सुधारित ऊर्जा आणि कुलिंग उपायसुविधा यांतील अत्यावश्यक डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये सातत्य, कार्यक्षमता आणि भविष्यासाठी तयार, सक्षम राहून भारतातील आमच्या टीम्स कंपनीच्या उद्दिष्टात सक्रिय योगदान कशा प्रकारे देत आहेत हे यातून दिसून येते.”
“हा उपक्रम म्हणजे केवळ व्हर्टिवमधील तांत्रिक प्रतिभा विकसित करण्याचाच नव्हे तर मिशन-‘क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर’ साठी आमच्यावर अवलंबून असलेल्या आमच्या जागतिक भागीदार आणि ग्राहकांसाठी देखील पाया ठरत आहे,” असे व्हर्टिवच्या पुणे हबचे वरिष्ठ संचालक डेव्हिड याओ यांनी सांगितले. “अनुभवी प्रशिक्षक आणि जोडीला लाइव्ह यंत्रणा, डिजिटल साधने आणि प्रगत प्रयोगशाळा एकत्र करून आम्ही उच्च-घनतेच्या डेटा सेंटर वातावरणात इंस्टॉलेशन, देखभाल आणि सतत सुधारणा करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करत आहोत. क्षमता विकासाच्या पलीकडे, व्हर्टिव अकॅडमी आमच्या अभियांत्रिकी टीम्ससाठी ज्ञानवृद्धीचे केंद्र म्हणून कार्य करते. त्यायोगे त्यांची या क्षेत्रातील तज्ज्ञता, कौशल्य अधिक सखोल होते. क्रॉस-फंक्शनल इनोव्हेशन म्हणजेच आंतरकार्य नाविन्यपूर्णतेला चालना मिळते आणि करिअर मार्ग वेगाने वाढतात. अकॅडमी आणि टेक्नॉलॉजी एक्सलन्स सेंटर हे पुणे आता जागतिक प्रतिभा आणि नाविन्यपूर्णता केंद्र म्हणून उदयास येत असल्याचे प्रतीक आहे.”
या सुविधा केंद्रामध्ये पाच समर्पित प्रशिक्षण बे असून त्यात मुख्य उत्पादन क्षेत्रांचा समावेश आहे. त्यामुळे सहभागीना ऊर्जा यंत्रणा, कूलिंग आर्किटेक्चर्स आणि मॉनिटरिंग टेक्नॉलॉजीज मध्ये व्यावहारिक कौशल्ये आणि अनुभव मिळू शकतात. येथे प्रशिक्षण घेणारे नियंत्रित परिस्थितींमध्ये वास्तविक अंमलबजावणीच्या कामात सहभागी होतात. यातून ग्राहकांसोबत कामाचा वास्तविक अनुभव मिळतो आणि व्हर्टिवच्या विश्वासार्हता, सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या मानकांची अंमलबजावणी करण्यासाठी टीम्सना सक्षम केले जाते. यातला आशय मॉड्युलर आहे आणि व्हर्टिवच्या उत्पादनांच्या रोडमॅप आणि जागतिक सर्वोत्तम पद्धतींशी सुसंगतपणे विकसित होतो.
ट्रेनिंग अकॅडमी आणि टेक्नॉलॉजी एक्सलन्स सेंटर हे व्यापक व्हर्टिव हब/IBS स्ट्रॅटेजी आणि हब अकॅडमी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून कार्य करतात. विशेषतः व्हर्टिवच्या जागतिक वितरण नेटवर्कमध्ये प्रतिभा विकास आणि सातत्यपूर्ण सुधारणा यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सातत्यपूर्ण शिक्षण, नाविन्यपूर्णता आणि उच्च कार्यक्षमता संस्कृतीला प्रोत्साहन देत हे समर्पित प्रत्यक्ष अनुभवाधारित केंद्र AI साठीचे हब, प्रगत ऊर्जा आणि कूलिंग तंत्रज्ञान, तसेच अत्याधुनिक व्हाईट स्पेस सोल्यूशन्ससाठी एक केंद्र म्हणून देखील कार्य करते.
# # #


